मोटोरोलाः नवा फोल्डेबल फोन, जबरदस्त फीचर्स

नवी दिल्लीः मोटोरोलाने याआधीच स्पष्ट केले आहे की, कंपनी नेक्स्ट जनरेशन मोटो रेजर फ्लिप () स्मार्टफोन आणणार आहे. आता कंपनीने अधिकृतपणे हे स्पष्ट केले आहे की, यावर्षी सप्टेंबर महिन्याता कंपनी नवीन मोटो फ्लिप लाँच करणार आहे. मोटोरोलाच्या पहिल्या फोल्डेबल फोनमध्ये काही चुका आढळल्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. आता कंपनी फोनचा सेकंड जनरेशन मॉडल आणखी चांगल्या फीचर्ससह आणण्याची तयारी करीत आहे. या फोनची किंमत सध्याच्या फोनमपेक्षा कमी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाचाः कंपनीचा आयकॉनिक फोन आहे मोटो रेजर मोटोर रेजर कंपनीचा आयकॉनिक फोन आहे. या फोनला कंपनीने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात लाँच केले होते. या फोनचा सेल २०२० मध्ये सुरू झाला होता. भारतीय बाजारात या फोनची किंमत १.२५ लाख रुपये आहे. मोटो रेजर २०१९ चे वैशिष्ट्ये व फीचर्स मध्ये ६.२ इंचाचा फ्लेक्सिबल ओलेड एचडी (876x2142 पिक्सल) दिला आहे. डिस्प्ले पॅनेलला पूर्णपणे फोल्ड केल्यानंतर अर्धे केले जाऊ शकते. फोनमध्ये एक सेकंडरी २.७ इंचाचा ओलेड क्विक व्ह्यू स्क्रीन दिला आहे. याचे रिझॉल्यूशन ६०० x ८०० पिक्सल आहे. या स्क्रीनचा वापर सेल्फीसाठी, नोटिफिकेशन पाहण्यासाठी आणि संगीत ऐकण्यासाठी आणि गुगल असिस्टेंटसाठी केला जावू शकतो. स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७१० प्रोसेसर आणि ६ जीबी रॅम दिला आहे. वाचाः मोटोरोच्या या फोनमध्ये १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आला आहे. फोनमध्ये अँड्रॉयड ९ पाय वर चालतो. कनेक्टिविटीसाठी मोटोरोला रेजर २०१९ मध्ये ४जी, वायफाय, एसी, ब्लूटूथ, ५.०, जीपीएस, एनएफसी आणि यूएसबी टाईप सी फीचर्स देण्यात आले आहेत. हँडसेटला पॉवर देण्यासाठी २५१० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. जी १८ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. एकदा फुल चार्ज झाल्यानंतर ही बॅटरी एक दिवस पूर्ण चालते, असा कंपनीचा दावा आहे. वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2M81V4h

Comments

clue frame