नोकियाच्या फोनमध्ये खास फीचर, कॉल रेकॉर्ड करता येणार

नवी दिल्लीः अँड्रॉयड वन स्मार्टफोमध्ये एक जबरदस्त फीचर आले आहे. नोकियाचे फोन बनवणारी कंपनी एचएमडी ग्लोबलने ही घोषणा केलीआहे. भारतातील अनेक अँड्रॉयड वन नोकिया स्मार्टफोन्सच्या गुगल फोन अॅपवर कॉल रेकॉर्डिंग फीचर देण्यात आले आहे. नोकिया फोनमध्ये हे नवीन फीचर युजर्संना व्हाईस करण्याची सुविधा देणार आहे. एचएमडी ग्लोबलचे चीफ फ्रोडक्ट अधिकारी जुहो सारविकस यांनी ही माहिती दिली आहे. भारतातील युजर्स या फीचरची खूप मागणी करीत होते. आता अँड्रॉयड वन नोकिया स्मार्टफोन युजर्संला हे फीचर मिळणार आहे. वाचाः नोकिया फोनमध्ये अस अॅक्टिव करा फीचर नोकिया फोनमध्ये हे फीचर हवे असल्यास युजर्संना प्ले स्टोरमध्ये फोन अॅपच्या लेटेस्ट व्हर्जनला अपडेट करावे लागेल. नोकियाचा स्मार्टफोन अँड्रॉयड १० सिस्टमचा सपोर्ट करणारा नोकियाचा फोन हवा आहे. रेकॉर्डिंग अॅक्टिव करण्यासाठी युजरला कॉल करताना केवळ रेकॉर्ड बटन दाबावे लागणार आहे. त्यानंतर कॉल रेकॉर्डिंग पर्यंत पोहोचण्यासाठी युजर्सला Recents टॅबवर जावे लागणार आहे. जर कॉलला रेकॉर्ड करण्यात आले असेल तर युजर्सला कॉन्टॅक्ट नावाने किंवा फोन नंबरच्या खाली रेकॉर्डेड लेबल दिसेल. वाचाः नोकियाच्या या स्मार्टफोनसाठी खास फीचर फोन युजर कॉल एन्ट्रीवर क्लिक केल्यानंतर प्ले बटन सोबत कॉल रेकॉर्डिंग प्लेअर येतो. कॉल रेकॉर्डिंग, क्लाउड मध्ये नव्हे तर युजरच्या फोनमध्ये ते सर्व सेव होईल. ज्या अँड्रॉयड वन नोकिया स्मार्टफोनसाठी हे खास फीचर मिळणार आहे. त्यात 9 PureView, नोकिया 8.1, Nokia 8 Sirocco, नोकिया 7.2, Nokia 7.1, नोकिया 7 प्लस, Nokia 6.2, नोकिया 6.1, Nokia 6.1 Plus, नोकिया 4.2, Nokia 3.2, नोकिया 3.1 प्लस, Nokia 2.3 आणि नोकिया 2.2 या स्मार्टफोनचा समावेश आहे. वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2zTA2tv

Comments

clue frame