दमदार बॅटरी-जबरदस्त फीचरसह मोटोरोलाचा स्वस्त स्मार्टफोन लाँच

नवी दिल्लीः कंपनीने सर्वात स्वस्त स्मार्टफोन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत केवळ ८ हजार ९९९ रुपये आहे. मोटोरोलाकडून सांगण्यात आले आहे की, फोन स्वस्त असला तरी या फोनच्या क्वॉलिटीमध्ये कोणतीही तडजोड करण्यात आली नाही. फीचर्समध्येही हा स्मार्टफोन दमदार आहे. या फोनमध्ये 5000mAh मोठी बॅटरी दिली आहे. सिंगल चार्ज केल्यानंतर दोन दिवस बॅकअप देते. वाचाः मोटोरोलाची पॉवर सीरिजचा हा डिव्हाईस मोठ्या बॅटरीसह येतो. कंपनीच्या माहितीनुसार, हा फोन एकदा चार्ज केल्यानंतर या फोनवर १०० तास गाणे ऐकू शकता येतील सिंगल चार्ज केल्यानंतर १९ तास व्हिडिओ प्लेबॅक ऑफर करता येते. Moto G8 Power Lite स्मार्टफोन त्या युजर्संसाठी खास बनवण्यात आला. ज्या युजर्संना जास्त पैसे खर्च करायचे नाहीत पण, पॉवरफुल स्मार्टफोन हवा आहे. या फोनची विक्री २९ मे पासून फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे. ट्रिपल कॅमेरा सिस्टम Moto G8 Power Lite मध्ये कंपनीने रियर पॅनेलवर ट्रिपल कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. या सेटअपमध्ये १६ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर, आणि एक मायक्रो व्हिजन कॅमेरा दिला आहे. तसेच या फोनमध्ये ४एक्स सपोर्ट दिला आहे. सेल्फीसाठी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वाचाः दमदार परफॉर्मन्स मिळणार या स्मार्टफोनमध्ये अल्ट्रा- रिस्पॉन्सिव परफॉर्मन्सिव देण्यासाटी डिझाईन करण्यात आले आहे. या फोनमध्ये 2.3Ghz ऑक्टा कोर Mediatek Helio P35 प्रोसेसर दिला आहे. तसेच यात ४ जीबी रॅम देण्यात आला आहे. तसेच ६४ जीबी इंटरनल स्टोरेज दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज २५६ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकतो. फोनमध्ये ६.५ इंचाचा मॅक्स व्हिजन एचडी प्लस दिला आहे. वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3g3UJ6V

Comments

clue frame