नोकियाच्या पहिल्या 5G स्मार्टफोनमध्ये ही खास सुविधा मिळणार

नवी दिल्लीः (Nokia) ने मार्चमध्ये झालेल्या एका ऑनलाइन कार्यक्रमात कंपनीने पहिला ५ जी फोन ची घोषणा केली होती. कंपनीने या फोनच्या फीचर्स आणि किंमतीची घोषणा केली होती परंतु, लाँचिंग नेमकी कधी होणार हे स्पष्ट केले नव्हते. आता नोकियाने आपल्या अधिकृत पेजवर एक टीझर व्हिडिओ जारी केला आहे. ज्यावरून अंदाज बांधला जावू शकतो की, फोन लवकरच लाँच होऊ शकतो. नोकिया Nokia 8.3 5G या फोचनी सुरुवातीची किंमत जवळपास ४९ हजार ५०० रुपये असणार आहे. हा फोन पोलर नाईट रंगात उपलब्ध होईल. वाचाः Nokia 8.3 5G चे खास वैशिष्ट्ये नोकियाच्या या फोनच्या फीचर्समध्ये ६.८१ इंचाचा फुल एचडी प्लस प्योर डिस्प्ले दिला आहे आहे. डिस्प्लेत पंच होल मिळणार आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७६५ जी प्रोसेसर मिळणार आहे. हा फोन ६ जीबी आणि ८ जीबी रॅम प्लस ६४ जीबी आणि १२८ जीबी स्टोरेजच्या पर्यायात उपलब्ध होणार आहे. फोनचा फिंगरप्रिंट सेन्सर या बटनात दिला आहे. जो साईड पॅनलला लावण्यात आला आहे. ६४ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा या फोनच्या कॅमेऱ्यार एक नजर टाकली तर नोकियाच्या पहिल्या स्मार्टफोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर शिवाय यात १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. या चारही कॅमेऱ्यात ZEISS लेन्सचा वापर करण्यात आला आहे. फ्रंट कॅमेऱ्यात २४ मेगापिक्सलचा पंच होल कॅमेरा दिला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉयड १० वर काम करतो. तसेच कंपनीने २ वर्षापर्यंत अँड्रॉयडपर्यंत अपडेट देण्याचे आश्वासन दिले आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3erzVVp

Comments

clue frame