दररोज 1GB डेटा, जिओचा सर्वात स्वस्त प्लान

नवी दिल्लीः जर तुम्हाला जास्त डेटा खर्च करण्याची सवय नसेल किंवा तुम्ही डेटापेक्षा कॉलिंग जास्त करीत असाल तर जिओचा १ जीबी डेटा देणारा हा सर्वात स्वस्त प्लान आहे. दररोज १ जीबी डेटा देणाऱ्या प्लानसंबंधी जाणून घ्या. रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या तिन्ही कंपन्यांचे १ जीबी डेटा देणारे पॅक आहेत. जिओचा १ जीबी डेटा देणारा प्लान यात सर्वात स्वस्त प्लान आहे. या प्लानमध्ये तुम्हाला दुसऱ्या नेटवर्क नंबरवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळत नाही. तर एअरटेल आणि व्होडाफोन प्लानमध्ये तुम्हाला कोणत्याही नंबरवर फ्री कॉलिंगची सुविधा मिळते. वाचाः सर्वात स्वस्त जिओचा प्लान या प्लानमध्ये युजर्संना दररोज १ जीबी डेटा मिळतो या प्लानची किंमत १४९ रुपये आहे. या प्लानची वैधता २४ दिवस आहे. प्लानमध्ये युजर्संना एकूण २४ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये जिओ ते जिओ कॉलिंग फ्री मिळते. तर अन्य नेटवर्क कॉलिंगसाठी ३०० नॉन जिओ मिनिट मिळतात. या प्लानमध्ये युजर्संना दररोज १०० एसएमएस ची सुविधा मिळते. तसेच जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. एअरटेलचा १२९ रुपयांच्या प्लानममध्ये १ जीबी डेटा दरदिवस १ जीबी डेटा देणारा एअरटेलचा १२९ रुपयांचा प्लान आहे. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. प्लानमध्ये २८ जीबी डेटा मिळतो. एअरटेलच्या या प्लानमध्ये देशभरात कोणत्याही नंबरवर फ्री कॉलिंग करण्याची सुविधा मिळते. या प्लानमध्ये दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. या प्लानमध्ये Xstream आणि ZEE5 प्रीमियम चे सब्सक्रिप्शन फ्री मिळते. वाचाः व्होडाफोनचे १ जीबी डेटा देणारे दोन प्लान व्होडाफोनकडे १ जीबी डेटा देणारे २ रिचार्ज प्लान आहेत. व्होडाफोनचा पहिला प्लान १९९ रुपयांचा आहे. या प्लानची वैधता २४ दिवसांची आहे. या प्लानमध्ये एकूण २४ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये कोणत्याही नंबरवर फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. प्लानमध्ये युजर्संना व्होडाफोन प्ले आणि झी ५ चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. तसेच दररोज १०० एसएमएस मिळतात. व्होडाफोनचा दुसरा प्लान २१९ रुपयांचा आहे. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये युजर्संना एकूण २८ जीबी डेटा मिळतो. तसेच देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. या प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा आहे. तसेच व्होडाफोन आणि झी५ चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/36qzasI

Comments

clue frame