रियलमी X50m 5G स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत-फीचर्स

नवी दिल्लीः रियलमी ने एक्स ५० सीरिजचा लेटेस्ट स्मार्टफोन X50m 5G लाँच केला आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये ५ कनेक्टिविटी, चार रियर कॅमेऱ्याचा जबरदस्त प्रोसेसरचा सपोर्ट दिला आहे. तसेच या फोनमध्ये युजर्संना ३० वॅटची फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. भारतासह अन्य देशात हा स्मार्टफोन कधी लाँच होणार, याबाबत कंपनीने अद्याप माहिती दिली नाही. वाचाः X50m 5G ची किंंमत रियलमी कंपनीने दोन रॅममध्ये हा फोन लाँच केला आहे. ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १९९९ चिनी युआन म्हणजेच २१ हजार ५६२ रुपये तर ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २४ हजार ७९९ रुपये ठेवण्यात आली आहे. या स्मार्टफोनला स्टारी ब्लू आणि गॅलेक्सी व्हाईट कलर या दोन पर्यायात उपलब्ध करण्यात आले आहे. या स्मार्टफोनची विक्री २९ एप्रिल पासून सुरू होणार आहे. वाचाः X50m 5G ची खास वैशिष्ट्ये कंपनीने या स्मार्टफोनमध्ये ६.५७ इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७६५ चिपसेट दिला आहे. स्मार्टफोन अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. या फोनमध्ये क्वॉड कॅमेरा दिला आहे. ज्यात ४८ मेगापिक्सलाचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल आणि २-२ मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये फ्रंटला १ मेगापिक्सलचा आणि २ मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा दिला आहे. वाचाः रियलमीने या स्मार्टफोनमध्ये ३० वॅट फास्ट चार्जिंगसह ४२०० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. तसेच या फोनमध्ये ड्युअल सिम, वाय-फाय, ब्लूटूथ ५.०, जीपीएस, एनएफसी आणि यूएसबी पोर्ट टाईप सी यासारखे फीचर्स दिले आहेत. वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cHltHU

Comments

clue frame