सॅमसंग गॅलेक्सी S20 Ultra फोनच्या डिस्प्लेत प्रॉब्लेम

नवी दिल्लीः सॅमसंग कंपनीचा महागडा स्मार्टफोन असलेला आणि सॅमसंग गॅलेक्सी S20 सीरीजमधील नुकताच लाँच करण्यात आलेला या फोनमध्ये प्रॉब्लेम यायला सुरुवात झाली आहे. सॅममोबाइल आणि गिजचायना च्या रिपोर्टनुसार, कंपनीने सुरुवातीला आलेल्या ऑटोफोकस प्रॉब्लेम दुरूस्त केला आहे. परंतु, आता या अपडेटनंतर दुसरा प्रॉब्लेम यायला सुरुवात झाली आहे. यावेळी फोनच्या कॅमेऱ्यात नव्हे तर डिस्प्लेमध्ये अडचण येत आहे. फोनचा डिस्प्ले ग्रीन होत असल्याच्या युजर्संच्या तक्रारी आहेत. वाचाः गॅलेक्सी एस२० अल्ट्रा मध्ये Exynos प्रोसेसरच्या तक्रारी आहेत. या फोनचा डिस्प्ले ग्रीन होत आहे. तसेच जास्त रिफ्रेश रेट (120Hz) आणि ३० टक्के कमी ब्रायटनेस झाल्याने अशा अडचणी येत आहेत. फोनमध्ये हा प्रॉब्लेन नेहमी येत नाही. ग्रीन स्क्रीनची समस्या सॅमसंग पे, कॅलक्युलेटर, स्नॅपचॅट, टेलिग्राम, क्रोम किंवा पबजी अॅप्स ओपन केल्यानंतर येत असल्याचे युजर्संनी म्हटले आहे. या बगला ठिक करण्यासाठी फोनला फॅक्ट्री रिसेट करते. त्यामुळे ही हार्डवेअरची नव्हे तर सॉफ्टवेअरशी संबंधित असलेली समस्या असल्याचे सांगण्यात येते. सॅमसंगच्या इंजिनिअर्सला आतापर्यंत या बगची माहिती उलगडण्यात यश आले नाही. हे एक सॉफ्टवेअर अपडेट असून ते लवकरच ठीक होईल. वाचाः Galaxy S20 Ultra ची किंमत व वैशिष्ट्ये गॅलेक्सी एस२० सीरिजमधील हा फोन सर्वात प्रीमियम असा फोन आहे. या फोनमध्ये 100x डिजिटल झूमसह १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये ६.९ इंचाचा क्वॉड एचडी प्लस डायनॅमिक AMOLED 2x डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन दोन पर्यायात म्हणजेच १२ जीबी आणि १६ जीबीत आहेत. १२८ जीबी, २५६ जीबी आणि ५१२ जीबी मध्ये पर्याय उपलब्ध आहे. मेमरी कार्डच्या मदतीने मेमरी १ टीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. हा फोन सर्वात महागडा फोन आहे. या फोनची किंमत ९२ हजार ९९९ रुपये आहे. वाचाः या फोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर (वाइड अँगल) सह ४८ मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स, १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एक डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी ४० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे फोन चार्जिंगसाठी 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. फास्ट चार्जिंगसाठी ४५ वॅट सपोर्ट देण्यात आला आहे. वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3biU0M6

Comments

clue frame