रियलमीचे Narzo 10 आणि Narzo 10A भारतात २१ एप्रिलला लाँच होणार

नवी दिल्लीः रियलमीने गेल्या महिन्यात नार्जो सीरिजला लाँच केले होते. परंतु, भारतात लॉकडाऊन सुरू असल्याने रियलमीने भारतात नार्जो सीरिज लाँच केली नव्हती. परंतु, कंपनीने आता या संदर्भात माहिती दिली आहे. आणि हे दोन स्मार्टफोन भारतात येत्या २१ एप्रिल रोजी लाँच करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. रियलमीची ही लॉचिंग ऑनलाइन होणार आहे. युजर्संना रियलमी इंडियाच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर हा कार्यक्रम पाहता येवू शकतो. वाचाः रियलमीचे सीईओ माधव सेठ यांनी ट्विटरवर या नार्जो सीरिजच्या लाँचिंगची माहिती दिली आहे. नवीन तारखेची घोषणा त्यांनी ट्विटरवर केली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलेय, अखेर ती बातमी आली. ज्या बातमीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. #realmeNarzo पुन्हा एकदा तुमच्यासमोर आहे. #FeelThePower साठी तयार राहा. २१ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजता एका ऑनलाइन व्हिडिओ स्ट्रीमिंग लाइव कार्यक्रमात याची लाँचिंग केली जाणार आहे. वाचाः कंपनीने नवीन नार्जो सीरिजसाठी रियलमीची नजर स्मार्टफोन वापरणाऱ्या तरुण वर्गावर आहे. नार्जो १० मध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा मॉड्यूल देण्यात येणार असल्याची माहिती आहे. रियर पॅनलवर एक व्हर्टिकल कॅमेरा सेटअप असणार आहे. नार्जो १० ए मध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरीसह फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी देण्यात येणार आहे. फोनमध्ये एक ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात येणार आहे. नार्जो सीरिजच्या दोन्ही फोनमध्ये ब्लूटूथ ५, जीपीएस, नैविक, ड्यूअल सीम ४जी, व्हीओएलटीई, यूएसबी टाइप सी, ३.५ एमएम हेडफोन जॅक यासारखे फीचर देण्यात येणार आहेत. वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3eqwsHg

Comments

clue frame