शाओमीचा Mi10 यूथ एडिशन लाँच, पाहा किंमत

नवी दिल्लीः टेक कंपनी शाओमीने चीनमध्ये आपला नवीन एमआय१० यूथ एडिशन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने स्वस्तातील ५ जी स्मार्टफोन म्हणून हा स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनची किंमत २२ हजार ५०० रुपये आहे. यात वॉटर ड्रॉप नॉच आणि पंच होल डिझाईन देण्यात आली आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात स्नॅपड्रॅगन ७६५ जी प्रोसेसर दिला आहे. यात गेमिंगसाठी ड्युअल मोड सस्पेन्शन लिक्वीड कुलिंग आणि फोटोग्राफीसाठी चार रियर कॅमेरे दिले आहेत. वाचाः ला चीनमध्ये लाँच करण्यात आले आहे. हा फोन म्हणजे फेब्रुवारी लाँच करण्यात आलेल्या Mi 10 चा थोडा डाऊनग्रेड व्हर्जन आहे. या रियरमध्ये 50X डिजिटल झूम सोबत एक क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. चीनमध्ये या फोनची विक्री ३० एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. वाचाः ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २०९९ चिनी युआन म्हणजेच २२ हजार ५०० रुपये आहे. ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या स्मार्टफोनची किंमत २२९९ चिनी युआन म्हणजेच २४ हजार ७०० रुपये आहे. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या स्मार्टफोनची किंमत २४९९ चिनी युआन म्हणजेच २६ हजार ९०० रुपये आहे. तर ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या स्मार्टफोनची किंमत २७९९ चिनी युआन म्हणजेच ३० हजार १०० रुपये आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक स्कील स्टोर्म, ब्लूबेरी मिंट, फोन सीजन स्प्रिंग मिल्क ग्रीन, पीच ग्रेपफ्रूट आणि व्हाईट पीच उलाँग कलरमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. पाहाः या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल आहे. यात कॉर्निंग गोरिला ग्लास ५ चे प्रोटेक्शन दिले आहे. फोटोग्राफीसाठी यात रियरमध्ये क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा आहे. तसेच यात ५० एक्स झूम आणि ५ एक्स ऑप्टिकल झूमसोबत ८ मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एक मायक्रो लेन्स देण्यात आला आहे. सेल्फीसाठी यात १६ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2KByYge

Comments

clue frame