नवी दिल्लीः फ्लिप स्मार्टफोन सेगमेंटमध्ये दक्षिण कोरियाची दिग्गज टेक कंपनी एलजीने आपला नवीन फोन लाँच केला आहे. हा एक एन्ट्री लेवल फोन आहे. कंपनीने २०१८ साली बनवलेल्या ओरिजनल फोनचे अपडेट व्हर्जन म्हणून लाँच केले आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात दोन स्क्रीन देण्यात आली आहे. इंटरनल स्क्रीनसह या फोनमध्ये एक छोट्या साईजचा आउटर डिस्प्ले आहे. वाचाः या फोनची साइज १०७x५५x१८ एमएम आहे. १२७ ग्रॅम वजनाच्या या फोनमध्ये २.८ इंचाचा इंटरनल डिस्प्ले दिला आहे. हा डिस्ल्पे २४०x३२० पिक्सल आहे. आऊटर डिस्प्लेवर नजर टाकल्यास यात ०.९ इंचाची स्क्रीन दिली आहे. या स्क्रीनचा वापर टेक्स्ट मेसेज, कॉल आणि वेळ पाहण्यासाठी केला जाऊ शकतो. फोनच्या बॅकपॅनेलला २ मेगापिक्सलचा एक कॅमेरा दिला आहे. तसेच एसओएस बटन दिली आहे. याचा वापर इमरजन्सीसाठी केला जावू शकतो. एसओएस बटन दाबताच संकटकाळात १.५ सेकंदात नोंदणी केलेल्या नंबरवर कॉल जाईल. तसेच युजरच्या लोकेशनची माहिती सुद्धा पाठवते. वाचाः फोनमध्ये एवन व्हाईस सर्विस साठी टी९ की पॅड सह हॉट दिला आहे. तसेच डेटाची बचत व्हावी यासाठी यात खास डेटा सिक्युरिटी फीचर देण्यात आले आहे. १ जीबी रॅम सह या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन २१० चिपसेट देण्यात आला आहे. फोनची इंटरनल मेमरी ८ जीबी आहे. मायक्रो एसडी कार्डच्या साहायाने ती वाढवता येऊ शकते. या फोनमध्ये १४७० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. कंपनीने हा फोन प्लॅटिनम ग्रे आणि व्हाइट या दोन रंगात उपलब्ध केला आहे. दक्षिण कोरियात या फोनची विक्री १७ एप्रिलपासून करण्यात येणार आहे. या फोनची किंमत १६२ डॉलर म्हणजेच १२ हजार रुपये आहे. वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ygbR7O
Comments
Post a Comment