iQoo Neo 3 5G स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत-फीचर्स

नवी दिल्लीः स्मार्टफोन कंपनी आयक्यू (iQoo) ने आपला जबरदस्त स्मार्टफोन नीओ ३ ५जी () चीनमध्ये लाँच केला आहे. युजर्संना या स्मार्टफोनमध्ये लेटेस्ट स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर, ४५०० एमएएच क्षमतेची बॅटरी आणि ४४ वॅट फास्ट चार्जिंग फीचर सपोर्ट मिळणार आहे. तसेच कंपनीने या फोनमध्ये ५ जी कनेक्टिविटी दिली आहे. चीनमध्ये लाँच करण्यात आला असला तरी भारत सह अन्य देशात हा स्मार्टफोन कधी लाँच करणार याविषयी कंपनीने अद्याप काहीही माहिती दिली नाही. वाचाः iQoo Neo 3 5G ची किंमत कंपनीच्या ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत चिनी युआन २६९८ म्हणजेच २८ हजार ९०० रुपये, ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २९९८ चिनी युआन म्हणजेच ३२ हजार १०० रुपये, १२ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ३२९८ चिनी युआन म्हणजेच ३५ हजार ४०० आणि ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या स्मार्टफोनची किंमत ३३९८ चिनी युआन म्हणजेच ३६ हजार ४०० रुपये ठेवण्यात आली आहे. नाईट ब्लॅक आणि स्काय ब्लू कलर या दोन पर्यायात खरेदी करता येवू शकते. या फोनची विक्री २९ एप्रिलपासून सुरू होणार आहे. वाचाः iQoo Neo 3 5G ची खास वैशिष्ट्ये आयक्यू निओ ३ ५जी स्मार्टफोनमध्ये ६.५७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०८ पिक्सल आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर दिला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉयड १० वर आधारीत आयक्यू यूआय ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. तसेच सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः आयक्यूने या फोनमध्ये ४४ वॅट फास्ट चार्जिंगच्या फीचरसह ४५०० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. या स्मार्टफोनमध्ये कनेक्टिविटीसाठी वाय फाय, ५जी, जीपीएस, ब्लूटूथ, ३.५ एमएम हेडफोन जॅक आणि यूएसबी पोर्ट टाइप सी यासारखे फीचर्स देण्यात आले. वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2x38ocz

Comments

clue frame