आयफोन १२ ची किंमत iPhone 11 पेक्षा कमी

नवी दिल्लीः स्वस्तातील आयफोन लाँच केल्यानंतर अॅपलने आता वर काम करणे सुरू केले आहे. कंपनीचा हा पहिला ५ जी फोन असणार आहे. या फोनची लाँचिंग या वर्षी होऊ शकते. सीरिजच्या फोनची किंमत ६०० आणि ७०० डॉलर असणार आहे. म्हणजेच ही किंमत आयफोन ११ च्या तुलनेत कमी आहे, अशी माहिती एका रिपोर्टमधून समोर आली आहे. या रिपोर्टमध्ये म्हटले की, आयफोन १२ प्रो ची डिझाईन आयफोन ५ सारखी असणार आहे. यात २.५डी ग्लासच्या ऐवजी सरळ ग्लासचा वापर करण्यात येवू शकतो. वाचाः या सीरिजच्या स्मार्टफोनमध्ये ए१४ बायोनिक प्रोसेसर दिला जाईल. आता पर्यंत समोर आलेल्या रिपोर्टनुसार, या सीरिज अंतर्गत चार मॉडेल आयफोन १२, आयफोन १२ प्लस, आयफोन १२ प्रो आणि आयफोन १२ प्रो मॅक्स लाँच करण्यात येणार आहेत. आयफोन १२ मध्ये ५.४ इंचाची स्क्रीन, आयफोन १२ प्लस मध्ये ६.१ इंचाची स्क्रीन, आयफोन १२ प्रोमध्ये ६.१ इंचाची स्क्रीन, आणि आयफोन १२ प्रो मॅक्समध्ये ६.७ इंचाची स्क्रीन दिली जाऊ शकते. सीरिजच्या दोन स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा, एलसीडी स्क्रीन आणि स्लीम अॅल्युमिनियम अलॉय फ्रेमचा वापर केला जाऊ शकतो. अन्य दोन मॉडेलमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा, ओलेड स्क्रीन आणि स्टेनलेस स्टील मिडल फ्रेमचा वापर केला जावू शकतो. वाचाः आयफोन १२, आयफोन १२ प्लस, आयफोन १२ प्रो आणि या तीन फोनला सप्टेंबर महिन्यात लाँच करण्याची शक्यता आहे. आयफोन १२ प्रो मॅक्सला ऑक्टोबर महिन्यात लाँच करण्याची शक्यता आहे. वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35ftEZj

Comments

clue frame