नवी दिल्लीः टेक कंपनी ऑनरने नवीन वर्षात बरेच स्मार्टफोन ग्लोबल बाजारात लाँच केले आहेत. आता कंपनीने , आणि हे तीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. युजर्संना या तीनही स्मार्टफोनमध्ये एचडी डिस्प्ले पासून जबरदस्त कॅमेऱ्याचा सपोर्ट मिळणार आहे. कंपनीने याआधी ८ए आणि ८ए प्राईम हे दोन स्मार्टफोन लाँच केले होते. वाचाः पाहा किंमत ऑनर कंपनीने Honor 9A या स्मार्टफोनची किंमत ११ हजार ३०० रुपये, Honor 9C या स्मार्टफोनची किंमत १३ हजार ४०० रुपये, आणि Honor 9S या स्मार्टफोनची किंमत ७ हजार २०० रुपये ठेवली आहे. तसेच ग्राहकांना या फोनसोबत फ्रीमध्ये ऑनर ४ बँड मिळणार आहे. या तिन्ही स्मार्टफोनची विक्री ४ मे पासून सुरू होणार आहे. वाचाः Honor 9A ची वैशिष्ट्ये या स्मार्टफोनमध्ये ६.३ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. तसेच मीडियाटेक एमटी ७६६२ आर चिपसेट सोबत ३ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज दिला आहे. या फोनमध्ये युजर्संना ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. ज्यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स, ५ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. स्मार्टफोनमध्ये फ्रंटला ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. वाचाः Honor 9C ची वैशिष्ट्ये ऑनर ९ सी या फोनमध्ये ६.३९ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. तसेच या फोनमध्ये Kirin 710 चिपसेट सोबत ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज दिला आहे. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. ज्यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स, ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये फ्रंटला ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. वाचाः Honor 9S ची वैशिष्ट्ये ऑनर ९ एस या स्मार्टफोनमध्ये ५.४५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. तसेच या फोनमध्ये मीडियाटेक एमटी ६७६२ आर चिपसेट सोबत २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजचा सपोर्ट दिला आहे. या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये ३०२० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ydSbSn
Comments
Post a Comment