नवी दिल्लीः मेसेजिंग सर्विस अपडेट ठेवण्यासाठी गुगलचा रेकॉर्ड खास नसला तरी लॉकडाऊनच्या काळात सर्च इंजिन फार अॅक्टिव राहिले आहे. गुगलने आपले प्रसिद्ध मीटिंग सॉफ्टवेअरला अपडेट केले आहे. त्यामुळे वर्क फ्रॉम होम करणाऱ्या युजर्संसाठी चांगले प्लेटफॉर्म बनवण्यासाठी काम केले जात आहे. लेटेस्ट अपडेटवर नजर टाकल्यास गुगल मिट वर आता एकत्र १६ लोकांना व्हिडिओ कॉल करता येणार आहे. वाचाः गुगलचे उपाध्यक्ष जेवियर सोल्टेरो यांनी न्यूज एजन्सी रॉयटर्सला माहिती दिली. गुगल व्हिडिओ मीटिंग सर्विस Google Meet (याआधी ) वर आता एकत्र १६ युजर्संना कॉल करता येणार आहे. तसेच प्रसिद्ध व्हिडिओ कॉन्फ्रेसिंग प्लेटफॉर्म झूमचा लेआउट गुगल मिटवर पाहायला मिळू शकणार आहे. याआधी गुगल मिटवर केवळ चार लोक कॉलवेळी स्क्रीनच्या ग्रिडवर दिसत असायचे. कॉलला कनेक्टची नव्हे तर कॉलवेळी स्क्रीनवर दिसत असलेल्या पार्टिसिपेंट्स संदर्भात सांगितले जात आहे. स्क्रीनवर केवळ चार युजर्स ग्रिडमध्ये दिसत असले तरी Google Meet सर्विस G Suite इंटरप्राइज युजर्ससाठी २५० युजर्स पर्यंत एक कॉलमध्ये सपोर्ट करते. तर G Suite बेसिकवर एका कॉलमध्ये १०० युजर्सचा समावेश केला जावू शकतो. G Suite फॉर बिजनेससाठी १५० युजर्स कॉलमध्ये सहभागी होऊ शकतात. दरम्यान, झूम आताही पुढे आहे. कारण, यावर एकाचवेळी ४९ लोक ग्रिडमध्ये दिसू शकतात. वाचाः आता जीमेलवरुन रिसिव्ह करा कॉल्स गुगल युजर्स आता सरळ हून Meet कॉल रिसिव्ह करू शकतात. याआधी हे फीचर हँगआऊटमध्ये नव्हते. झूम सारख्या प्लेटफॉर्मला रिप्लेस करण्याचा गुगलचा प्रयत्न आहे. गुगल यावर चांगले काम करीत आहे. Google Meet सर्वात वेगाने वाढणारी गुगलची सर्विस आहे. यावर्षी जानेवारीपासून २५ टक्के दररोज युजर्स वाढले आहे. वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2KmKETG
Comments
Post a Comment