नवी दिल्लीः देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन असल्याने आपल्या ग्राहकांनी घरातच राहावे यासाठी सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलने आपल्या युजर्संसाठी आणखी एक गुड न्यूज दिली आहे. बीएसएनएलने आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी ९९९ रुपयांची किंमत असलेली अॅमेझॉन प्राईम मेंबरशीप फ्री मध्ये देणे सुरू केले आहे. वाचाः बीएसएनएलच्या ३९९ रुपयांपेक्षा जास्त असलेल्या पोस्टपेड युजर्संना ही ऑफर मिळणार आहे. या सर्व ग्राहकांना अॅमेझॉनचे सब्सक्रिप्शन फ्री मध्ये मिळणार आहे. या प्लानमध्ये ४०१ रुपये, ४९९ रुपये, ५२५ रुपये, ७२५ रुपये, ७९८ रुपये, ७९९ रुपये, ११२५ रुपये आणि १५२५ रुपयांच्या प्लानचा समावेश आहे. ४९९ रुपये आणि ७९८ रुपयांचा प्लान केवळ कर्नाटक आणि तेलंगाणा या सर्कलमध्ये उपलब्ध आहेत. बीएनएनएलने आपल्या ब्रॉडबँड युजर्सला सुद्धा अॅमेझॉन प्राईम सब्सक्रिप्शन फ्री मध्ये द्यायला सुरुवात केली आहे. तसेच बीएसएनएलच्या ७४५ रुपयांचा प्लान किंवा त्यापेक्षा जास्त प्लान रिचार्ज करावा लागणार आहे. तर बीएसएनएलच्या ३९९ रुपयांच्या ब्रॉडबँड प्लानच्या वार्षिक सब्सक्रिप्शन वर सुद्धा अॅमेझॉन प्राईमची ऑफर मिळणार आहे. वाचाः एअरटेलच्या पोस्टपेड आणि ब्रॉडबँड प्लानच्या युजर्संना अॅमेझॉन प्राईम आणि झी५ चे प्रीमियम सब्सक्रिप्शन मिळणार आहे. तर व्होडाफोनने सुद्धा आपल्या अनेक प्लानवर डिजिटल स्ट्रिमिंग प्लेटफॉर्मचे फ्री सब्सक्रिप्शन देणे सुरू केले आहे. वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cJajT4
Comments
Post a Comment