मस्त! करोना व्हायरची अधिकृत माहिती येथे मिळेल

नवी दिल्लीः करोना व्हायरसला हरवण्यासाठी संपूर्ण देश एकजुटीने उभा आहे. भारत सरकारने लोकांच्या मदतीसाठी काही महत्त्वपूर्ण , चॅटबॉट, ई-मेल आणि आयडी नंबर जारी केले आहेत. करोना व्हायरसच्या मदतीसाठी हे नंबर्स, ई-मेल आयडी आणि चॅटबॉट उपयोगी पडतील. वाचाः संदर्भातील सरकारी वेबसाईट करोना व्हायरस संदर्भातील काही माहिती हवी असल्यास तुम्ही आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची अधिकृत वेबसाइट https://www.mohfw.gov.in/जा. या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती मिळेल. तसेच या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यांचे हेल्पलाइन नंबर आहेत. वाचाः करोना हेल्पडेस्क चॅटबॉट केंद्र सरकारने गेल्या महिन्यात व्हॉट्सअॅप आणि टेलग्राम मेसेजिंग अॅपवर MyGov Corona Helpdesk नंबर जारी केला होता. या नंबरवर तुम्हाला करोना व्हायरसची संपूर्ण माहिती मिळेल. हा 9013151515 नंबर सर्वात आधी सेव्ह करा. त्यानंतर hi लिहून व्हॉट्सअॅप मेसेज पाठवा. त्यानंतर तत्काळ एक मेसेज येईल. त्यात करोना हेल्पलाइन नंबर देण्यात येईल. तसेच तुम्ही विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर दिले जाईल. वाचाः राष्ट्रीय हेल्पलाइन नंबर सरकारने सर्व देशवासियांसाठी करोना व्हायरस हेल्पलाइन नंबर 91-11-23978046 जारी केला आहे. या नंबरवर लोकांना व्हाईस कॉल करून माहिती मिळेल. वाचाः १२ राज्यांचे हेल्पलाइन नंबर सरकारने १२ राज्यांसाठी १०४ हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. या नंबरचा वापर करून बिहार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, झारखंड, कर्नाटक, पंजाब, सिक्कीम, तेलगांना आणि उत्तराखंड या राज्यातील लोक या नंबरचा वापर करू शकतात. वाचाः करोना व्हायरसचा टोलफ्री नंबर सरकारने देशवासियांसाठी टोल फ्री नंबर १०७५ जारी केला आहे. लोकांना या नंबरवर कॉल केल्यानंतर करोना विषयीची माहिती मिळेल. तसेच सरकारची ईमेल आयडी ncov2019@gov.in उपलब्ध करण्यात आली आहे. वाचाः मानसिक रुग्णांसाठी टोल फ्री नंबर लॉकडाऊन सुरु असल्याने अनेकांना मानसिक तणाव निर्माण होतो. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने टोल फ्री क्रमांक 08046110007 जारी केला आहे. वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bgZasl

Comments

clue frame