फ्लिपकार्ट-अॅमेझॉनवरील सेलची लवकरच गुड न्यूज

नवी दिल्लीः करोना व्हायरस भारतात पसरल्याने सर्व सेवा ठप्प झाली आहे. करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. देशातील लॉकडाऊन ३ मे रोजी संपणार असल्याने मे महिन्यात ऑनलाइन शॉपिंग साइट्स आपला सेल सुरू करण्याची शक्यता आहे. युजर्संना अनेक वस्तू खरेदी करायच्या आहेत. परंतु, लॉकडाऊन असल्याने ऑनलाइन शॉपिंग कंपन्यांनी आपली सेवा सध्या बंद ठेवली आहे. आणि मे महिन्यात एक मोठा सेल आयोजित करणार आहे. वाचाः फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन या दोन कंपन्यांनी सरकारला एक रिपोर्ट दिला आहे. या रिपोर्टनुसार, लोकांनी लॉकडाऊनच्या काळात सर्वाधिक काय सर्च केले. यासंबंधीची माहिती या रिपोर्टमध्ये आहे. सर्वाधिक सर्च केलेल्या वस्तूंमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅबलेट, एसी, फ्रिज, वॉशिंग मशीन, फॅन, प्रिंटर, वेबकॅम आणि व्हॅक्युम क्लिनर, टीव्ही यासारख्या उत्पादनांचा समावेश आहे. सर्वात जास्त एसीला सर्च करण्यात आले आहे. उन्हाळा सुरू झाल्याने गरमी वाढणार असल्याने लोकांना एसी खरेदी करायचा आहे. परंतु, देशात सध्या लॉकडाऊन असल्याने एसी खरेदी करता येत नाही. वाचाः देशात लॉकडाऊन असल्याने अनेक जण ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर जाऊन उत्पादने पाहणे पसंत करीत आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतर काय-काय खरेदी करायचे आहे. याची यादी आतापासूनच काही जण तयार करीत आहेत. गेल्या महिन्यापासून म्हणजेच मार्च महिन्यापासून ऑनलाइन शॉपिंग साईट्स बंद आहेत. ऑनलाइन शॉपिंग कंपन्यांचा सर्व व्यवहार ऑनलाइन असल्याने त्यांची कमाई सध्या ठप्प आहे. ऑनलाइन सेलचे आयोजन करून या कंपन्या पुन्हा एकदा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील आहेत. वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ym047Z

Comments

clue frame