मस्तच! हुवेईच्या 'या' स्मार्ट टीव्हीत पॉप-अप कॅमेरा

नवी दिल्लीः चीनची प्रसिद्ध टेक्नोलॉजी कंपनी हुवेईने अखेर आपला लाँच केला आहे. Huawei Smart Screen ला चीनमध्ये लाँच करण्यात आले आहे. कंपनीने नोवा ७ सीरिज स्मार्टफोनसोबत लाँच केले आहे. हुवेईच्या नवीन स्मार्ट टीव्हीला स्लीम बेजल डिझाइन देण्यात आली आहे. या टीव्हीची विक्री २६ एप्रिलपासून सुरू होणार आहे. या टीव्हीचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात स्मार्टफोन सारखा पॉप अप कॅमेरा दिला आहे. वाचाः या स्मार्ट टीव्हीची किंमत ३,७९९ चिनी युआन म्हणजेच जवळपास ४१ हजार रुपये आहे. या टीव्हीची विक्री २६ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. चीनची ई-कॉमर्स वेबसाईट Vmall वरून सर्वात आधी ही टीव्ही खरेदी करता येवू शकेल. Huawei Smart Screen V55i TV मध्ये ५५ इंचाचा ४ के एलसीडी डिस्प्ले दिला आहे. यात २.६ मिलीमीटरचे स्लीम बेजल देण्यात आले आहेत. यात टीव्हीत क्वॉड-कोर प्रोसेसर दिला आहे. ग्राफिक्ससाठी माली-जी५१ जीपीयू देण्यात आला आहे. यात ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इनबेल्ट स्टोरेज दिला आहे. वाचाः डिस्प्लेच्या वरच्या भागात Huawei Smart Screen V55i TV मध्ये एक पॉप अप कॅमेरा दिला आहे. ज्याचे रिझॉल्यूशन १०८० पिक्सल आहे. यात एक स्मार्ट ऑडियो सिस्टम दिला आहे. तसेच २.४ एल चा मोठा साऊंड कॅविटी स्पीकर देण्यात आला आहे. हा टीव्ही म्हणजे एक स्मार्ट रिमोट कंट्रोल सोबत आहे. यात व्हाईस कंट्रोलसारखे फीचर्स देण्यात आले आहे. कंपनीने चीनमध्ये नोवा ७ स्मार्टफोन सीरिज लाँच केली आहे. कंपनीने या सीरिज अंतर्गत Nova 7 5G, Nova 7 Pro 5G आणि Nova 7 SE स्मार्टफोन लाँच केले आहेत. हे तिन्ही स्मार्टफोन्स मिडनाईट ब्लॅक, सिल्वर, फोरेस्ट ग्रीन आणि मिडसमर पर्पल व हनी रेड कलर यात उपलब्ध करण्यात आले आहेत. कंपनीने या स्मार्टफोन्सच्या उपलब्धतेची अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cQ3I95

Comments

clue frame