नवी दिल्लीः रिलायन्स जिओने कमी कालावधी खूप जास्त युजर्स बेस बनवण्यात यश मिळवले आहे. जिओच्या जवळ मोठ्या संख्येत प्रीपेड ग्राहक आहेत. त्यांच्यासाठी जबरदस्त रिचार्ज पॅक उपलब्ध आहेत. परंतु, पोस्टपेड प्लानमध्ये कंपनी स्वस्तातील प्लान ऑफर देत आहे. रिलायन्स जिओच्या १९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लानमध्ये युजर्संना अनलिमिटेड कॉल आणि डेटा दिला जात आहे. वाचाः जिओच्या पोस्टपेड प्लानची २८ दिवसांची वैधता आहे. या प्लानसाठी तुम्हाला १९९ रुपये मोजावे लागतील. पोस्टपेड प्लानमध्ये एकूण २५ जीबी हाय स्पीड डेटा दिला जातो. या प्लानची मर्यादा संपल्यानंतर ग्राहकांना २० रुपये प्रति जीबी या दराप्रमाणे पैसे मोजावे लागतील. या प्लानमध्ये १०० एसएमएस प्रति दिन दिले जातात. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात व्हाईस कॉलसाठी कोणतीही मर्यादा नाही. म्हणजेच ग्राहक अनलिमिटेड कॉलिंगची मजा घेऊ शकतात. तसेच या प्लानमध्ये अॅप्सचे सब्सक्रिप्शन फ्री मध्ये दिले जाते. वाचाः जिओच्या या १९९ रुपयांच्या पोस्टपेज प्लानसाठी सिक्युरिटी डिपॉझिट फी जमा करणे आवश्यक आहे. ही सिक्युरिटी डिपॉझिट फी १०० टक्के परत केली जाते. जिओ प्राईमसाठी ९९ रुपये मोजावे लागतात. रिलायन्स जिओकडे १९९ रुपयांचा प्रीपेड प्लान आहे. या प्लानमध्ये २ जीबी डेटा दरदिवशी दिला जातो. म्हणजेच ग्राहकांना एकूण ४२ जीबी डेटा मिळतो. तसेच अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग आणि जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन दिले जाते. या पॅकमध्ये १०० एसएमएस फ्रीमध्ये दिले जाते. वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/35bVXrK
Comments
Post a Comment