व्होडाफोन-आयडिया युजर्संना झटका, ही ऑफर बंद

नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडियाने आपल्या ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. देशातील ८ सर्कलमधील डबल डेटा ऑफर देणारा प्लान बंद केला आहे. कंपनीने गेल्या महिन्यात २४९ रुपये, ३९९ रुपये आणि ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये डबल डेटा ऑफर दिला जात होता. या प्रीपेड प्लानमध्ये युजर्संना १.५ जीबी डेटा मिळत होता. डबल डेटा ऑफर नंतर ३ जीबी डेटा होत होता. व्होडाफोन-आयडियाच्या माहितीनुसार, आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात, केरळ, महाराष्ट्र आणि गोवा, नॉर्थ इस्ट, पंजाब आणि उत्तर प्रदेश (पश्चिम) येथील युजर्संना डबल डेटा ऑफर आता मिळणार नाही. वाचाः २४९ रुपयांचा प्लान डबल डेटा ऑफरमध्ये युजर्संना या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटा (१.५ जीबी प्लस १.५ जीबी डेटा) मिळत होता. युजर्संना या प्लानमध्ये आधी प्रमाणे अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस सुविधा मिळणार आहे. तसेच युजर्संना व्होडाफोन प्ले आणि जी५ यासारखे प्रीमियम अॅप उपलब्ध असणार आहे. या पॅकची वैधता २८ दिवसांची आहे. ३९९ रुपयांचा डेटा प्लान डबल डेटा ऑफर अंतर्गत युजर्संना या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटा १.५ जीबी प्लस १.५ जीबी डेटा मिळत होता. युजर्संना आता अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस सुविधा मात्र मिळणार आहे. तसेच युजर्संना या व्होडाफोन प्ले आणि जी५ यासारखे प्रीमियम अॅप उपलब्ध आहे. या पॅकची वैधता ५६ दिवसांची आहे. ५९९ रुपयांचा प्लान डबल डेटा ऑफर अंतर्गत युजर्संना आधी दररोज ३ जीबी डेटा १.५ जीबी प्लस १.५ जीबी डेटा मिळत होता. युजर्संना या प्लानमध्ये आता अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएसची सुविधा मिळणार आहे. तसेच युजर्संना व्होडाफोन प्ले आणि जी ५ यासारखे प्रीमियम अॅप उपलब्ध असणार आहेत. या पॅकची वैधता ८४ दिवस इतकी आहे. वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2xqUDEZ

Comments

clue frame