टाटा स्कायची भन्नाट ऑफर, २ महिने फ्री पाहा टीव्ही

नवी दिल्लीः डीटीएच युजर्ससाठी एक गुड न्यूज आहे. प्रसिद्ध डीटीएच कंपनी TATA Sky ने आपल्या युजर्ससाठी दोन महिन्यांची फ्री सर्विस ऑफर केली आहे. लाँग टर्म सब्सक्रिप्शन प्लान घेतल्यास ग्राहकांना दोन महिने फ्री सर्विस देणार आहे. ऑफरला सर्व युजर्स अॅक्टिवेट करू शकतात. परंतु, यासाठी कंपनीने काही अटी सुद्धा ठेवल्या आहेत. वाचाः टाटा स्कायची दोन महिन्यांची फ्री सर्विस हवी असल्यास युजर्संना एकाचवेळी १२ महिन्यांचे रिचार्ज करावे लागेल. रिचार्ज झाल्यानंतर दोन दिवसांच्या आत कंपनी युजरच्या अकाउंटमध्ये एक महिन्याचा कॅशबॅक आणि सात दिवसासाठी दुसऱ्या महिन्याचे कॅशबॅक क्रेडिट केले जाईल. ही ऑफर ३० जून २०२० पर्यंत आहे. कंपनीच्या या ऑफरचा फायदा घ्यायचा असेल तर युजर्संना सिटी बँकच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरून आपला टाटा स्काय अकाउंट रिचार्ज करावे लागणार आहे. वाचाः युजर्संना या ऑफरची माहिती व्हावी यासाठी टाटा स्कायने खास व्यवस्था केली आहे. ज्या युजर्संना १२ महिन्यांच्या रिचार्जच्या किंमतीची माहिती नाही. त्या युजर्संना याची माहिती कमी रिचार्ज रक्कम एंटर केल्यानंतर होईल. जर एखादा युजर २०० रुपयांचा रिचार्जची रक्कम एंटर करीत असेल तर त्या युजर्सला पॉप अप द्वारे १२ महिन्यांचे रिचार्ज रक्कम आणि ऑफरची माहिती मिळू शकते. जर कोणी युजर्स या ऑफरला अॅक्टिव करू इच्छित असेल तर प्रोसीड टू रिचार्ज बटनावर क्लिक करून सिटी बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरून पेमेंट करावे लागेल. वाचाः कंपनीने या ऑफरवर काही अटी घातल्या आहेत. ज्या युजर्सकडे आधीच टाटा स्कायचा लाँग टर्मचे सब्सक्रिप्शन आहे. त्या युजर्संना कंपनीने सिटी बँक कॅशबॅक ऑफरच्या बाहेर ठेवले आहे. तसेच कंपनीने हेही सांगितले की, ही ऑफर केवळ आधी असलेल्या युजर्ससाठी आहे. टाटा स्काय अकाउंटच्या अॅक्टिवेशन डेटवर करण्यात आलेल्या रिचार्जवर ही ऑफर मिळणार नाही, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2KG7KVS

Comments

clue frame