एअरटेल, व्होडाफोन-आयडियाने ३ मे पर्यंत वैधता वाढवली

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊन ३ मे पर्यंत जाहीर केला आहे. पंतप्रधानांच्या या घोषणेनंतर युजर्संना दिलासा देण्यासाठी टेलिकॉम कंपन्या पुढे आल्या आहेत. आणि कंपन्यांनी या महिन्यात ज्या प्लानची वैधता संपणार होती. ती आता ३ मे पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे या युजर्संना मोठा दिलासा मिळाला आहे. वाचाः पहिल्या लॉकडाऊनमध्ये टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या मोबाइल युजर्संना १७ एप्रिल पर्यंत वैधता वाढवली होती. ही वैधता वाढवण्यात आल्याने प्री पेड ग्राहकांची वैधता संपणार होती. त्या युजर्संना मोठा दिलासा मिळाला होता. देशभरात सध्या ३ मे पर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. त्यामुळे युजर्संना अडचणीचा सामना करावा लागू नये, म्हणून येत्या ३ मे पर्यंत युजर्संची इनकमिंग सुरू राहणार आहे. एकीकडे या कंपन्यांनी वैधता वाढवली असली तरी जिओने मात्र अद्याप वैधता वाढवण्याची कोणतीही घोषणा केली नाही. वाचाः सर्वात आधी टेलिकॉम कंपन्यांनी एटीएम आणि मिस्डकॉलवरून मोबाइल रिचार्ज करण्याची सुविधा दिली होती. तसेच दुसऱ्यांचे रिचार्ज करणाऱ्या युजर्संना कंपन्यांनी ४-६ टक्के कमिशन देण्यास सुरुवात केली आहे. वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2VBNPMJ

Comments

clue frame