सॅमसंग आणि गुगलची आरोग्य कर्मचाऱ्यांना फ्री सेवा

नवी दिल्लीः करोना वॉरियर्सच्या मदतीसाठी यासारख्या दोन कंपन्या पुढे आल्या आहेत. सॅमसंग आणि गुगल कंपनीने म्हटले की, आरोग्य कर्मचाऱ्यांचे स्मार्टफोन फ्रीमध्ये रिपेयर करून दिले जातील. इंग्रजी वेबसाईट द वर्ज ने दिलेल्या माहितीनुसार, मोबाइल रिपेयरिंग साठी या दोन कंपन्यांनी uBreakiFix सोबत हातमिळवणी केली आहे. जर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या फोनमध्ये काही बिघाड झाल्यास त्या कर्मचाऱ्यांना uBreakiFix सेंटरमध्ये जाऊन किंवा गॅलेक्सी फोनमध्ये ई-मेल करावा लागेल. पाहाः सॅमसंगची वेबसाईटवरून फोन खरेदी केल्यास ३० टक्के सूट सुद्धा दिली जात आहे. परंतु, ही ऑफर केवळ आरोग्य कर्मचारी आणि करोना वॉरियर्स यांच्यासाठीच आहे. सॅमसंगच्या फ्री मोबाइल रिपेयरिंग प्रोग्रामला 'Free Repairs for The Frontline' असे नाव दिले आहे. या प्रोग्राम अंतर्गत स्क्रीन फुटल्यास, बॅटरी रिप्लेसमेंट आणि मोबाइल रिपेयरिंग यासारखी काम करण्यात येतील. ही ऑफर आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ३० जून पर्यंत उपलब्ध आहे. वाचाः गुगल प्रोग्राम सुद्धा सॅमसंग सारखाच आहे. गुगल पिक्सल युजर्स आरोग्य कर्मचारी अमरिकेतील असेल तर uBreakiFix च्या कोणत्याही सेंटरमध्ये जाऊन आपला फोन फ्रीमध्ये रिपेयर करू शकतो. गुगलचा प्रोग्राम सुद्धा ३० जून पर्यंत वैध आहे. याआधी रियलमी, ओप्पो, टेक्नो आणि ईटेल यासारख्या मोबाइल कंपन्यांनी आपल्या युजर्संच्या फोनची वॉरंटी २ महिन्यांपर्यंत वाढवली आहे. रियलमीने आपल्या सर्व उत्पादनाची वॉरंटी ३१ मे पर्यंत वाढवली आहे. या वॉरंटीमध्ये रियलमीचे स्मार्टफोन, स्मार्ट बँड, इयरबड्स, इयरफोन आणि पॉवर बँकचा समावेश आहे. ही ऑफर केवळ २० मार्च ते २० एप्रिल पर्यंत वॉरंट संपण्याऱ्या उत्पादनांवर देण्यात येत आहे. वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2S8xWMT

Comments

clue frame