'आयफोन १२' मोठ्या डिस्प्लेसह लाँच होणार, ट्विटमधून माहिती

नवी दिल्लीः अमेरिकेची टेक कंपनी अॅपल () ने नुकताच आपला स्वस्तातील आयफोन एसई२ () जागतिक बाजारात लाँच केला आहे. कंपनी आता आणखी एका जबरदस्त स्मार्टफोनवर काम करीत आहे. या सीरिजवर कंपनी सध्या काम करीत आहे. प्रसिद्ध टिप्सटर जॉन प्रोसर यांच्या ट्विटटर अकाउंटवरून ही माहिती समोर आली आहे. जॉन प्रोसरने आपल्या ट्विटर अकाउंटवर आयफोन १२ संबंधित काही स्केच शेअर केले आहेत. यावरून फोनची ही माहिती समोर आली आहे. वाचाः जॉन प्रोसर यांनी शेअर केला स्केच जॉन प्रोसर यांनी आयफोन १२ प्रो चे काही स्केच शेअर केले आहेत. ज्यात फोनची स्क्रीन पाहता येवू शकते. या स्केचनुसार, युजर्संना आयफोन १२ मध्ये छोटे नॉचसोबत मोठी स्क्रीन मिळणार आहे. तसेच स्क्रीनमध्ये ट्रू डेप्थ सेन्सर सुद्धा दिसत आहे. दरम्यान, अॅपलने आतापर्यंत आयफोन १२ संबंधित कोणतीही माहिती दिली नाही. आयफोन १२ ची डिझाईन ४ किंवा ५ सारखी मीडिया रिपोर्टनुसार, कंपनीने आयफोन १२ प्रोची डिझाईन ४ किंवा ५ सारखी असण्याची शक्यता आहे. युजर्संना आयफोन १२ प्रो मध्ये ६.१ इंच, आयफोन १२ मॅक्समध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो. एयरपॉड्स आणि मॅकबुक प्रो लवकरच लाँच अॅपल याशिवाय एयरपॉड्स आणि मॅकबुक प्रो पुढील महिन्यात लाँच करण्याची तयारी करीत आहे. याची माहितीही टिप्सटर जॉन प्रोसर यांनी दिली होती. प्रोसरच्या माहितीनुसार, अॅपल आपले नवे तंत्रज्ञान असलेले एयरपॉड्स आणि मॅकबुक प्रो लॅपटॉप पुढील महिन्यात बाजारात लाँच करणार आहे. परंतु, कंपनीने या दोन्ही डिव्हाईसच्या लाँचिंग संबंधी अद्याप काहीही घोषणा केली नाही. वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2XRjRqJ

Comments

clue frame