'रेडमी नोट ९' सीरिजचा लेटेस्ट स्मार्टफोन ३० एप्रिलला लाँच होणार

नवी दिल्लीः टेक कंपनी शाओमीने गेल्या महिन्यात भारतात नोट ९ प्रो आणि नोट प्रो मॅक्स हे दोन स्मार्टफोन लाँच केले होते. आता कंपनी लेटेस्ट सीरिज अंतर्गत आणखी एक स्मार्टफोन ग्लोबल बाजारात लाँच करणार आहे. याची माहिती कंपनीने अधिकृत ट्विटर अकाउंटवरून दिली आहे. कंपनीने आतापर्यंत या स्मार्टफोनची घोषणा मात्र केली नाही. परंतु, या स्मार्टफोनला नावाने बाजारात उतरवले जाऊ शकते. वाचाः कंपनीचे ट्विट शाओमीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट करताना म्हटले की, रेडमी नोट ९ सीरिजचा लेटेस्ट स्मार्टफोन ३० एप्रिलला लाँच करण्यात येणार आहे. परंतु, कंपनीने या स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स संबंधी कोणतीही माहिती दिली नाही. वाचाः रेडमी नोट ९ची संभावित किंमत लिक रिपोर्टच्या माहितीनुसार, कंपनी या स्मार्टफोनची किंमत मिड-प्रीमियम रेंज ठेवू शकते. या स्मार्टफोनची खरी किंमत व फीचर्स लाँचिंग कार्यक्रमानंतर माहिती होईल. वाचाः रेडमी नोट ९ ची संभावित वैशिष्ट्ये मीडिया रिपोर्ट्सनुसार, युजर्संना या स्मार्टफोनमध्ये ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळू शकतो. या फोनमध्ये मीडियाटेक हिलियो जी ८५ प्रोसेसर आणि ४ जीबी रॅमचा सपोर्ट मिळू शकतो. हा स्मार्टफोन १० ऑपरेटिंगवर काम करतो. या फोनमध्ये क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप दिला जावू शकतो. परंतु, आता पर्यंत सेन्सर्स आणि अन्य फीचर्सची माहिती उघड झाली नाही. वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cScweU

Comments

clue frame