नवी दिल्लीः व्हायरसवर मात करण्यासाठी जगभरात लढाई लढली जात आहे. दिग्गज टेक कंपनी गुगलनेही एक खास बनवून करोना व्हायरस विरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर्स आणि मेडिकल स्टाफला धन्यवाद दिले आहे. समाजासाठी योगदान देणाऱ्या मेडिकल कर्मचारी आणि डॉक्टर्ससाठी गुगलने एक खास डुडल तयार केले आहे. भारतात करोना व्हायरसमुळे सध्या लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. करोनावर मात करण्यासाठी सर्व जण प्रयत्नशील आहेत. वाचाः गुगलचे खास डुडल गुगलच्या या डुडलवर टॅप केल्यानंतर या ठिकाणी खास करोना व्हायरस संबंधीची माहिती, बातम्या वाचायला मिळतात. त्यानंतर एक व्हिडिओ सुद्धा दिसतो. ज्यात डॉक्टर्स करोना व्हायरसपासून वाचवण्यासाठी खास टिप्स देत आहेत. तर डॉक्टर्स लॉकडाऊन काळात घरात राहण्याच्या सूचना करताना दिसत आहेत. वाचाः करोनामुळे लॉकडाऊन करोना व्हायरसचा प्रादूर्भाव वाढल्याने देशात १५ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. परंतु, हा लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. काही राज्यात हा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. वाचाः करोना व्हायरस अपडेट भारतात सध्या करोना व्हायरसमुळे ३०८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ९१५२ लोकांना याचा संसर्ग झाला आहे. वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cbgQ8A
Comments
Post a Comment