'वनप्लस ८ सीरिज' आज भारतात लाँच होणार

नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन कंपनी वनप्लस (OnePlus) आज आपला खास ८ सीरीजला लाँच करणार आहे. या सीरिज अंतर्गत कंपनी आणि हे दोन स्मार्टफोन लाँच करणार आहे. लाँचिंग आधी वन प्लस ८ सीरिजची माहिती लीक झाली होती. ज्यात संभावित किंमत आणि काही फीचर्सची माहीती उघड झाली होती. वनप्लस ८ सीरिजमध्ये लेटेस्ट प्रोसेसर आणि जबरदस्त कॅमेऱ्याचा सपोर्ट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कंपनी आज वनप्लस ८ च्या ५ जी व्हेरियंटचीही घोषणा करण्याची शक्यता आहे. कंपनी याशिवाय OnePlus Bullets Wireless Z इयरबड्स सुद्धा लाँच करणार आहे. वाचाः वनप्लस ८ सीरिजचा लाँचिंग कार्यक्रम भारतात आज रात्री ८.३० वाजता सुरू होणार आहे. हा कार्यक्रम कंपनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर पाहता येवू शकतो. या सीरिजची किंमत प्रीमियम रेंजमध्ये असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. या सीरिजच्या स्मार्टफोनची खरी किंमत आणि या फोनचे खास वैशिष्ट्ये लाँचिंगनंतर स्पष्ट होईल. फोनला पॉवर देण्यासाठी वनप्लस ८ प्रोमध्ये ३० वॅट फास्ट चार्जिंग आणि वॉर्प चार्ज ३० वायरलेस चार्जिंग सपोर्ट सह ४५१० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे. तर वनप्लस ८ मध्ये ३० वॅट वॉर्प चार्ज ३० टी सपोर्ट सह ४३०० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे. हा फोन किती रॅम व जीबी स्टोरेजचा असेल याबाबत अद्याप काहीही माहिती समोर आली नाही. परंतु, वनप्लस ८ प्रो हा ८ जीबी प्लस १२८ जीबी आणि १२ जीबी प्लस २५६ जीबी स्टोरेज या पर्यायात असू शकतो. वाचाः वनप्लस ८ आणि ८ प्रो ची संभावित वैशिष्ट्ये लीक रिपोर्टनुसार, युजर्संना या दोन स्मार्टफोनमध्ये ६.४ इंचाचा डिस्प्ले मिळेल. ज्याचे रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज असेल. तसेच कंपनी दोन्ही स्मार्टफोनमध्ये जबरदस्त परफॉर्मन्ससाठी लेटेस्ट स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर देण्याची शक्यता आहे. परंतु, आतापर्यंत अन्य फीचर्स संदर्भात काही माहिती मिळाली नाही. वाचाः वनप्लस ८ आणि ८ प्रो चा सेल मीडिया रिपोर्टनुसार, लॉकडाऊन असल्याने या दोन्ही स्मार्टफोनचा भारतात सेल ३० एप्रिलनंतर सुरू करण्यात येईल. तर दुसरीकडे कंपनी या सीरिजला चीनमध्ये १६ एप्रिलला लाँच करणार असून १७ एप्रिलला या फोनचा सेल सुरू करणार आहे. वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34xm8Zm

Comments

clue frame