गुगलनं खास डुडलद्वारे शिक्षकांना म्हटलं 'थँक्यू'

नवी दिल्लीः गुगले शुक्रवारी एक खास डुडल साकारून सर्व शिक्षक आणि मुलांचा सांभाळ करणाऱ्यांचे आभार मानले आहेत. गुगलने डुडल साकारले आहे. कोविड१९ महामारी आल्याने लॉकडाऊन करण्यात आला आहे. तरीही शिक्षक मुलांना ऑनलाइन शिकवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या कार्याला गुगलने सलाम केला आहे. वाचाः गुगलचे खास डुडल गुगलचे खास डुडल आहे. गुगलच्या कॅपिटल (G) मधून एक दिलाचा आकार बनून तो स्मॉल (g) वर पोहोचतो. त्यानंतर दिल शिक्षकांकडे जाते. नंतर छोट्या-छोट्या दिलात विभाजन होऊन एक आकर्षक दृश्य बनते. काय दिसते डुडलमध्ये या डुडलमध्ये पाहू शकता की, शिक्षकांच्या पुढे एक लॅपटॉप ठेवला आहे. यावर कॅमेरेही आहेत. ते ऑनलाइन शिकवत आहेत. बोर्डवर काही तरी लिहिलेले दिसतेय. समोर टेबलावर एक पुस्तक दिसतेय. शिक्षकाच्या डाव्य बाजुला एक खिडकी आहे. म्हणजेच शिक्षक आपल्या घरी आहे. वाचाः डुडलवर क्लिक केल्यानंतर... डुडलवर क्लिक केल्यानंतर एक वेगळे पेज उघडते. यात दररोज जीवनातील मुलांची मदत करणारे आणि त्यांचे आयुष्य सोपे करणारे दृष्य दिसते. शाळेची बस, बसचा चालक, जेवण बनवणारी महिला, डॉक्टर, भाजीपाला विकणारा दुकानदार, सफाई कर्मचारी, पार्कमधील माळी, आदी दिसतात. भारतातील विविध राज्यांमध्ये करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत असून आतापर्यंत देशात एकूण १३, ३८७ जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, आतापर्यंत ४३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34MKbnh

Comments

clue frame