नवी दिल्लीः देशात करोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवला आहे. आज सकाळी देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक महत्त्वाच्या बाबी सांगितल्या. करोना व्हायरसला रोखण्यासाठी संसर्ग झालेल्या लोकांना ट्रॅक करणारा Aarogya Setu चा मोदी यांनी दुसऱ्यांदा उल्लेख केला आहे. करोनापासून वाचण्यासाठी अप डाऊनलोड करा, तसेच दुसऱ्यांनाही डाऊनलोड करण्यास सांगा असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. वाचाः काय आहे आरोग्य सेतू अॅप आरोग्य सेतू अॅप पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशी अंतर्गत नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटरची दिशा - निर्देशनसाठी बनवले आहे. प्ले स्टोरवर खूप सारे फेक अॅप्स आहेत. त्यामुळे जो ओरिजनल अॅप आहे तोच डाऊनलोड करा. या अॅपल एनआयसी ने पब्लिश केले आहे. त्यामुळे अँड्रॉयडवर NIC eGov Mobile Apps आणि आयफोन्समध्ये NIC दिसेल. असे दिसल्यानंतरच हा अॅप डाऊनलोड करा. आरोग्य सेतू अॅप ट्रेसिंग आहे. तसेच तुम्ही सुरक्षित आहात की नाही, हे माहिती पडते. मोबाइल नंबर, ब्लूटूथ आणि लोकेशन डेटाचा वापर केला जातो. ज्यावेळी युजर्स करोना संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येतो त्यावेळी हे अॅप युजर्संना अलर्ट करतो. हे अॅप अँड्रॉयड व आयफोन या दोन्ही व्हर्जनवर आहे. या अॅप मध्ये करोनाचे लक्षणे माहिती करण्यासाठी सेल्फ असेसमेंट आणि लोकांच्या मदतीसाठी करोना हेल्पलाइन सेंटर नंबर दिले आहेत. वाचाः आरोग्य सेतूचा असा वापर करा >> आरोग्य सेतू अॅपचा वापर करण्यासाठी फोन नंबरची नोंदणी करा. फोन नंबर टाकल्यानंतर एक ओटीपी येईल. ते एन्टर केल्यानंतर अॅपची नोंदणी होईल. >> त्यानंतर हे अॅप ब्लूटूथ आणि जीपीएसचे अॅक्सिस मागेल. >> अॅप उघडल्यानंतर पर्सनल माहिती विचारली जाईल. ज्यात लिंग, नाव, वय, व्यवसाय आणि ३० दिवसांचा प्रवासाची माहिती विचारली जाईल. तुम्ही हे पर्याय स्कीप करू शकतात. >> त्यानंतर भाषा निवडू शकतात. >> संकटाच्या या काळात स्वतः कार्यकर्ता म्हणून नोंदणी करू शकतात. >> आरोग्य सेतू अॅप हे एक सोशल ग्राफचा वापर करतो. ज्यात हाय रिस्कची एक गट माहिती पडतो. सोशल ग्राफ लोकेशनची माहिती या आधारावर बनवली जावू शकते. ज्यावेळी तुम्ही हाय रिस्कच्या गटात आले तर तुम्हाला अलर्ट मिळेल. हाय रिस्क गटात आल्यानंतर अॅप टेस्ट सेंटरला जाण्यासाठी सूचना करेल. वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3b81p0F
Comments
Post a Comment