नवी दिल्लीः चीनची कंपनी ओप्पोने आपला खास स्मार्टफोन लाँच केला आहे. युजर्संना या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८६५ चिपसेट, जबरदस्त डिस्प्ले आणि चार रियर कॅमेऱ्याचा सपोर्ट मिळणार आहे. तसेच कंपनीने या फोनमध्ये ५ जी कनेक्टिविटीचा सपोर्ट दिला आहे. भारतात हा स्मार्टफोन कधी लाँच होईल, याबाबत कंपनीने अद्याप अधिकृत घोषणा केली नाही. वाचाः Oppo Ace 2 ची किंमत ओप्पोने या स्मार्टफोनला तीन पर्यायात लाँच केले आहे. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज, ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज आणि १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज या तीन पर्यायाचा समावेश आहे. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ३९९९ युआन म्हणजेच ४३ हजार २०० रुपये, ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ४५९९ युआन म्हणजेच ४७ हजार रुपये, आणि १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ४९ हजार रुपये आहे. या फोनला ओरोरा सिल्वर, मून रॉक आणि फँटसी पर्पल या तीन रंगात उपलब्ध करण्यात आले आहे. हा फोन २० एप्रिलपासून चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. वाचाः Oppo Ace 2 चे खास वैशिष्ट्ये कंपनीने या फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी अमोलेज डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल आहे. तसेच स्क्रीनच्या प्रोटेक्शनसाठी गोरिला ग्लास ५ दिला आहे. युजर्संना या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसरचा सपोर्ट मिळेल. तसेच हा स्मार्टफोन अँड्रॉयड १० वर आधारित कलर ७.१ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. वाचाः Oppo Ace 2 चा कॅमेरा ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. ज्यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, २ मेगापिक्सलचा पोट्रेट सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेन्सर दिला आहे. तसेच या फोनमध्ये फ्रंटला १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. Oppo Ace 2 ची बॅटरी कंपनीने या फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी वायफाय, जीपीएस, ब्लूटूथ, ५जी नेटवर्क आणि यूएसबी पोर्ट टाइप सी यासारखी फीचर्स दिली आहेत. तेसच ६५ वॅट सुपरवोक फास्ट चार्जिंगचे फीचर सह ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34zymka
Comments
Post a Comment