5G कनेक्टिविटीचा लेटेस्ट स्मार्टफोन iQoo 3 चार हजारांनी स्वस्त

नवी दिल्लीः भारतात जीएसटी दर १२ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आल्यानंतर अनेक कंपन्यांनी आपल्या स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ केली आहे. परंतु, चीनची कंपनी आयक्यू याला अपवाद ठरली आहे. कंपनीने आपला लेटेस्ट स्मार्टफोन च्या किंमतीत ४ हजार रुपयांची कपात केली आहे. ग्राहकांना आता हा फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. कंपनीने हा स्मार्टफोन फेब्रुवारी २०२० मध्ये लाँच केला होता. लाँच होऊन स्मार्टफोनला केवळ दोन महिने झाले होते. वाचाः iQoo 3 ची किंमत ४ हजार रुपयांच्या कपातीनंतर ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ३४ हजार ९९० रुपये झाली आहे. या फोनची किंमत ३८ हजार ९९० रुपये होती. ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमतीत सुद्धा ४ हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे हा फोन आता ४१ हजार ९९० रुपयांऐवजी आता २७ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येवू शकतो. १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत आता ४६ हजार ९९० रुपयांऐवजी ४४ हजार ९९० रुपये झाली आहे. वाचाः iQoo 3 वैशिष्ट्ये या फोनमध्ये ६.४४ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले दिला आहे. रिझॉल्युशन १०८०x२४०० पिक्सल आहे. डिस्प्लेत पंच होल कॅमेरा आणि डिस्प्लेत फिंगरप्रिंट सेन्सर आहे. फोनमध्ये २.८४ GHz ऑक्टाकोर प्रोसेसर आणि क्वॉलकॉमचा लेटेस्ट आणि सर्वात पॉवरफुल स्नॅपड्रॅगन ८६५ चिपसेट दिला आहे. या फोनला ६ जीबी रॅम, ८ जीबी रॅम, १२ जीबी रॅमचा फोन भारतात लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये ४४४० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. वाचाः iQoo 3 मध्ये ४८ मेगापिक्सल कॅमेरा या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, १३ मेगापिक्सलचा टेलिफोटो सेन्सर २०एक्स झूम दिला आहे. १३ मेगापिक्सल वाइड अँगल आणि डेप्थ सेन्सर मायक्रो आणि बुके फोटो मोड करते. यात नाइट मोड, सुपर वाइड अँगल पासून मायक्रो मोड पर्यंत फोटोग्राफीसाठी आहे. कमी प्रकाशात चांगले फोटो क्लिक करता येवू शकतात. सेल्फीसाठी यात १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2xULSmK

Comments

clue frame