नवी दिल्लीः स्मार्टफोन बनवणारी कंपनी एचएमडी ग्लोबलने नोकिया २२० ४जी फीचर फोन चीनमध्ये लाँच केला आहे. युजर्संना या फोनमध्ये टॉर्च, एफएम रेडिओ, ड्युअल सिम, एमपी ३ प्लेयर आणि स्पीड डायलिंगचा सपोर्ट मिळणार आहे. तसेच या फोनमध्ये व्हीजीए कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीने आता पर्यंत नोकिया २२० ४जी फीचर फोन अन्य देशात कधी लाँच होणार आहे, यासंबंधी अद्याप काही माहिती दिली नाही. कंपनीने याआधी नोकिया १०५ फीचर फोन ग्लोबल बाजारात लाँच केला होता. वाचाः नोकिया २२० ४जी फीचर फोनची किंमत २२९ चिनी युआन म्हणजेच जवळपास ३ हजार २०० रुपये आहे. हा फीचर फोन ब्लॅक आणि ब्लू या दोन रंगात उपलब्ध करण्यात आला आहे तर या फोनची विक्री ७ मे पासून सुरू करण्यात येणार आहे. वाचाः नोकिया 220 4G फीचर फोनची वैशिष्ट्ये नोकिया २२० ४जी फीचर फोनमध्ये २.४ इंचाचा क्यूव्हीजीए डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये १६ एमबी रॅम आणि २४ एमबी स्टोरेज देण्यात आला आहे. यासाठी या फोनमध्ये युजर्संना एलईडी फ्लॅश, आणि नोकियाचा लोकप्रिय स्नेक गेम देण्यात आला आहे. एचएमडी ग्लोबलने या फीचर फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी ब्लूटूथ ४.२, यूएसबी पोर्ट, ३.५ एमएम हेडफोन जॅक यासारखे फीचर्स दिले आहेत. युजर्संना या फोनमध्ये १२०० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. ही बॅटरी ६.३ तासांचा बॅक अप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cSNTia
Comments
Post a Comment