Xiaomi Mi 10 'या' दिवशी भारतात होणार लाँच

नवी दिल्लीः शाओमीचा हा नवा स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात येणार आहे. गुरुवारी चीनी कंपनीने फोनच्या लाँचिंगची ही माहिती दिली आहे. शाओमीच्या या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. शाओमीचा Mi 10 भारतात ३१ मार्च रोजी लाँच करण्यात येणार आहे. याआधी शाओमीने एमआय १० आणि एमआय १० प्रो स्मार्टफोन गेल्या महिन्यात चीनमध्ये लाँच करण्यात आले आहे. काही ग्लोबल मार्केट्समध्ये या फोन्सला २७ मार्च रोजी लाँच केले जावू शकते. शाओमीने गुरुवारी मीडियांना निमंत्रण पाठवले आहे. हा फोन ऑनलाइन कार्यक्रमात लाँच करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ३१ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता सुरू होणार आहे. कंपनीने सोशल मीडिया चॅनेल आणि एमआय डॉट कॉम वर हा कार्यक्रम लाइव्ह पाहता येवू शकतो. कंपनीने निमंत्रण पाठवून #EvokeYourImagination हॅशटॅगचा वापर केला आहे. यातशिवाय #Mi10IsHere #108MP यासारखे हॅशटॅगचा वापर करीत आहे. इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनु कुमार जैन यांनी ट्विटरवर याची माहिती दिली आहे. भारतात या फोनची किंमत किती असणार आहे, याची माहिती कंपनीने अद्याप स्पष्ट केलेली नाही. शाओमीची एम सीरिज अंतर्गत लाँच होणाऱ्या स्मार्टफोन्समधील एमआय१० सीरीज पहिला फोन आहे. ४ वर्षानंतर भारतात ही सीरिज लाँच करण्यात येणार आहे. भारतात आयात शुल्क आणि जीएसटी वाढ झाल्याने या फोनची किंमत वाढू शकते. चीनमध्ये एमआय १० ची किंमत ३,९९९ चीनी युआन म्हणजेच जवळपास ४२,५०० रुपये, तर एमआय १० प्रोची किंमत ४,९९९ चीनी युआन म्हणजेच ५३ हजार रुपये आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी अमोलेड डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये ४ रियर कॅमेरे दिले आहेत. प्रायमरी कॅमेरा १०८ मेगापिक्सल आहे. हे ८ के व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्ट करते. एमआय १० मध्ये ४५०० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली असून ३० वॅट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे. तर एमआय १० प्रो मध्ये ४७८० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली असून ५० वॅट चार्जिंग स्पीड सपोर्ट दिला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन्स अँड्रॉयड १० बेस्ड मीयूआय ११ वर चालतो.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2UnIM1X

Comments

clue frame