झूम अॅपने WhatsApp-टिकटॉकला मागे टाकले

नवी दिल्लीः देशात सध्या करोना व्हायरसमुळे लॉकडाऊन सुरू आहे. जगभरात वर्क फ्रॉम होम सुरू आहे. ऑफिसच्या गरजेच्या मीटिंगसाठी व्हिडिओ कॉन्फ्रेसिंग अॅप चा मोठा वापर करण्यात येत आहे. सध्या भारतात प्ले स्टोरच्या फ्री सेक्शनमध्ये भारतातील नंबर वन अॅप झूम बनले आहे. तसेच या अॅपने टिकटॉक आणि व्हॉट्सअॅपला मागे टाकले आहे. झूम अॅपला भारतात ५ कोटींहून अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. एकाचवेळी १०० लोकांसोबत व्हिडिओ चॅटिंग झूम एक फ्री एचडी मीटिंग अॅप आहे. या अॅपवरून युजर एकाचवेळी जास्तीत जास्त १०० लोकांसोबत बोलू शकतो. अॅपचे खास वैशिष्ट्ये म्हणजे याचे सोपे युजर इंटरफेस आहे. तसेच झूम अॅपमध्ये अनेक फीचर देण्यात आले आहेत. जे युजर्सला खूप पसंत पडले आहेत. अॅपच्या फ्री व्हर्जनमधील कॉलमध्ये एकाचवेळी १०० लोक जोडता येवू शकता येतात. तसेच अॅपमध्ये वन-टू-वन मीटिंग आणि ४० मिनिटची ग्रुप मीटिंग कॉलिंगची सुविधा आहे. कुटुंबातील व्यक्तीसोबत कनेक्ट होत आहेत युजर्स प्रोफेशनल शिवाय युजर्स या अॅपलचा पर्सनल कॉलसाठी वापर करीत आहेत. या व्हिडिओ कॉन्फ्रेसिंग अॅपद्वारे युजर आपल्या अनेक कुटुंब सदस्यांना कनेक्ट होत आहेत. सोशल डिस्टिंग राखण्यासाठी हा पर्याय चांगला आहे. काही युजर्स या अॅपच्या माध्यमातून बर्थ डे पार्टीचे आयोजन करीत आहेत. वादात सापडले होते काही दिवसांपूर्वी झूम अॅप वादात सापडले होते. मदरबोर्डच्या एका रिपोर्टमध्ये म्हटले होते की, आयओएस व्हर्जन युजर्सचा डेटा फेसबुक पर्यंत पोहोचला जात आहे. हे अॅप ओपन केल्यानंतर युजर्सला टाइम झोन आणि शहराची माहिती फेसबुकला दिली जाते. ही बातमी लीक झाल्यानंतर कंपनी वादात अडकली होती. त्यानंतर कंपनीने तो कोड डिलिट केला.


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2xAZxio

Comments

clue frame