नवी दिल्लीः ने आपल्या युजर्संची चॅटिंग मजा वाढवण्यासाठी नवीन फीचर्स आणले आहेत. WhatsApp ने नुकताच डार्क मोड फीचर लाँच केले होते. हे फीचर अनेकांच्या पसंतीस उतरले आहे. व्हॉट्सअॅपने आता आणखी नवीन फीचर्स आणायचे ठरवले आहे. कंपनीने अँड्रॉयड आणि आयओएस युजर्संसाठी एक नवीन फीचर्स आणले आहे. WhatsApp मध्ये आधीच एक सर्च फीचर आहे. परंतु, हे फीचर केवळ कॉन्टॅक्ट आणि चॅट्स पर्यंत मर्यादीत आहे. आता कंपनीने नवीन फीचर आणले असून या फीचर अंतर्गत फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट, लिंक्स ऑडिओ फाइल आणि सर्च करणे सोपे होणार आहे. या फीरचा असा उपयोग करा या फीचरचा उपयोग करण्यासाठी सर्वात आधी तुमच्या फोनमध्ये WhatsApp चे लेटेस्ट व्हर्जन आणि चांगल्या स्पीडचे इंटरनेट असणे आवश्यक आहे. आता या साध्या स्टेप्स फॉलो करा... १. फोनमध्ये WhatsApp ओपन करा. नवीन सर्च बारकडे जाण्यासाठी अॅपच्या होम स्क्रीनवरील खालच्या बाजुला स्वाइप करा. २. त्यानंतर सर्च बार वर टॅप करा आणि चॅट्समधील तुम्हाला जे सर्च करायचे आहे ते सर्च करा. व्हॉट्सअॅपच्या या नवीन फीचरचा वापर करणे खूप सोपे आहे. तुम्हाला केवळ अॅप ओपन करायचा आहे. नवीन सर्च संबंधी खालच्या बाजुला स्वाइप करायचे आहे. सर्च बारवर टाइप करताच एक ड्रॉप डाउन मेन्यू उघडला जाईल. यात तुमचा फोटो, व्हिडिओ, GIFs, लिंक्स, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स आणि व्हिडिओ यासारखे कॅटगरी मिळेल. जर तुम्ही सर्व कॅटगरीमध्ये कोणतेही सर्च करीत असाल तर कोणत्याही ऑप्शनला सिलेक्ट करू नका. जर तुम्हाला कॅटगरी अंतर्गत सर्च करायचे असल्यास त्याला सिलेक्ट करा किंवा कीवर्ड सर्च करा. उदाहरणासाठी जर तुम्ही कोणाला शेअर करण्यात आलेले क्रिकेटसंबंधी फोटो किंवा व्हिडिओ सर्च करीत असाल तर तुम्हाला क्रिकेट संबंधी कीवर्ड सर्च करावे लागेल. असे केल्यास व्हॉट्सअॅपमधील क्रिकेट संबंधित सर्व माहिती फोटो, व्हिडिओ तुमच्या स्क्रीवर दिसेल.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39hit2A
Comments
Post a Comment