Text मेसेज डिलिट झालाय?, 'असा' परत मिळवा

नवी दिल्लीः मेसेज पाठवण्यासाठी सध्या आपण सर्वात जास्त व्हॉट्सअॅपचा वापर करीत असलो तरी अजूनही टेक्स्ट मेसेजचे (Text Message) महत्त्व कमी झालेले नाही. बँकेचे ट्रान्झॅक्शन असो किंवा कॉन्टॅक्ट नंबर पाठवण्यासाठी टेक्ट मेसेजा वापर सर्रासपणे केला जातो. परंतु, अनेकदा आपल्याकडून चुकून महत्त्वाचा टेक्स्ट मेसेज डिलिट होतो. अशा परिस्थितीत तो पुन्हा कसा मिळवायचा हे अनेकांना माहिती नसते. जर तुम्हाला तुमचा डिलिट झालेला मेसेज पुन्हा मिळवायचा असेल तर आपल्या लॅपटॉपमध्ये Android Data Recovery सॉफ्टवेअर टाकावे लागेल. ही पद्धत केवळ अँड्रॉयड डिव्हाइससाठी केली जावू शकते, हे मात्र ध्यानात ठेवावे लागेल. असा करा डिलिट झालेला टेक्स्ट मेसेज >> सर्वात आधी आपल्या लॅपटॉपमध्ये Android Data Recovery सॉफ्टवेअर सुरू करा. यूएसबी केबलद्वारे आपल्या फोनला कनेक्ट करा. >> फोन कनेक्ट झाल्यानंतर सॉफ्टवेअरकडून विचारण्यात येईल, कोणता डेटा रिकव्हर करायचा आहे. या ठिकाणी मेसेज निवडल्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करा. >> हे सॉफ्टवेअर डिलिट झालेले मेसेजला स्कॅन करते. आता तुम्हाला तुमच्या फोनमध्ये FonePaw अॅप इन्स्टॉल करावे लागेल. या अॅपला यूएसबीने इन्स्टॉल करा. >> अॅप इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला Android Data Recovery ला आपल्या डिलिट केलेल्या डेटाला अॅक्सेस करण्याची परवानगी द्यावी लागेल. >> आता FonePaw अॅप तुम्हाला मेसेज वाचण्यासंबंधी परवानगी मागेल. याला परवानगी द्या. >> सर्व परवानगी दिल्यानंतर आता Scan Authorized Files वर क्लिक करा >> जर आता डिलिट करण्यात आलेला मेसेज दिसत नसेल तर Deep Scan वर क्लिक करा >> असे केल्यास डिलिट झालेला मेसेज लाल रंगात दिसेल. >> तुम्ही हा मेसेज restore सुद्धा करू शकता.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2y4XyTx

Comments

clue frame