लॉकडाऊनः मोटोरोला Razr चा पहिला सेल रद्द

नवी दिल्लीः करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्याने देशात १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या लॉकडाऊनचा फटका मोटोरोला कंपनीला बसला आहे. मोटोरोलाचा आपला लेटेस्ट फोल्डेबल फोन रेजर (Motorola Razr)चा पहिला सेर रद्द करण्यात आला आहे. मोटोचा हा सेल २ एप्रिल रोजी होणार होता. आता ग्राहकांना हा फोन खरेदी करण्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. १४ एप्रिलला संपल्यानंतर मोटोच्या या फोनचा पहिला सेल १५ एप्रिलला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोटोरोलाच्या या फोनची किंमत एक लाख रुपयांच्या जवळपास आहे. कंपनीने अमेरिकेत लाँच केलेल्या फोनची किंमत १,४९९ डॉलर ( १ लाख ५ हजार ९८८ रुपये) ठेवण्यात आली आहे. मोटोरोलाच्या खास वैशिष्ट्यांवर एक नजर टाकल्यास स्पष्ट जाणवते की, कंपनीने या फोनमध्ये clamshell आणि फ्लिपची डिझाइन दिली आहे. तसेच युजर्संना या फोनमध्ये ६.२ इंचाचा ओएलईडी डिस्प्ले मिळणार आहे. या फोनचे रिझॉल्यूशन ८७६x२१४२ पिक्सल आहे. फोल्ड झाल्यानंतर या फोनची स्क्रीन साइज २.७ इंचाची होते. युजर्संना या डिस्प्लेमध्ये सेल्फी क्लिक करता येवू शकणार आहे. यात मेसेज नोटिफिकेशनसह म्युझीक कंट्रोल करण्याची सुविधा आहे. या फोनच्या परफॉरमन्ससाठी ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७१० एसओसी आणि सहा जीबी रॅम देण्यात आला आहे. मोटोरोलाने या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा प्रायमरी शूटर कॅमेरा दिला आहे. तसेच युजर्सना यात नाइट मोड व्हिजन मोड मिळणार आहे. त्यामुळे रात्रीच्या अंधारात जबरदस्त फोटो काढता येवू शकतो. तसेच फोनमध्ये एआय देण्यात आला आहे. तेसच फोनमध्ये फ्रंटला पाच मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. कंपनीने या फोनमध्ये ४जी एलईटी, ब्लूटूथ, वायफाय, जीपीएस आणि यूएसबी टाइप सी पोर्ट यासारखी सुविधाची फीचर्स दिली आहे. या फोनमध्ये २,५१० एमएएच क्षमतेची बॅटरी आणि १५ वॅट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2JuKeKK

Comments

clue frame