रेडमी Note 9S लाँच, पाहा किंमत-फीचर्स

नवी दिल्लीः शाओमीने लिक्स रिपोर्ट आल्यानंतर आपला नवीन स्मार्टफोन आज मलेशियात लाँच केला आहे. थायलंड आणि सिंगापूर मध्ये या स्मार्टफोनची विक्री या महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू होणार आहे. रेडमी नोट ९ एस हा नुकताच भारतात लाँच झालेल्या चा नवीन व्हर्जन आहे. रेडमी नोट ९एसचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या फोनच्या बॅकला आणि रियर पॅनेलवर गोरिला ग्लासचे ५ चे प्रोटेक्शन दिले आहे. Redmi Note 9Sची किंमत रेडमी नोट ९ एसच्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १३ हजार ७०० रुपये आहे. तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १५ हजार रुपये आहे. या फोनची विक्री मलेशियात या महिन्यानंतर होणार आहे. Redmi Note 9S वैशिष्ट्ये या फोनमध्ये अँड्रॉयड १० वर आधारित MIUI 11 आहे. तसेच या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल आहे. डिस्प्लेला HDR10 चाही सपोर्ट दिला आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७२० जी देण्यात आला आहे. जो ८ नॅनोमीटर प्रोसेसर वर तयार झाला आहे. फोनमध्ये ६ जीबी रॅम पर्यंत आणि १२८ जीबी पर्यंत स्टोरेज मिळणार आहे. Redmi Note 9S चा कॅमेरा या फोनमध्ये चार रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. याचा मुख्य कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा आहे. तर दुसरा लेन्स ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल, तिसरा लेन्स ५ मेगापिक्सलचा आणि चौथा मायक्रो लेन्स २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय चा सपोर्ट दिला आहे. Redmi Note 9S ची बॅटरी या फोनमध्ये ५०२० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. तसेच फास्ट चार्जिंगसाठी १८ वॅटचा फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. तसेच या फोनमध्ये 4G VoLTE,वाय-फाय, ब्लूटूथ ५.०, जीपीएस, नाविक, टाइप सी चार्जिंग पोर्ट आणि ३.५ हेडफोन जॅक देण्यात आला आहे. फोनच्या पॉवर बटनासाठी फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3djQYJb

Comments

clue frame