नवी दिल्लीः टेक कंपनी HMD Global ने आपला लोकप्रिय नोकिया ५३१० () नव्या डिझाइनसह लाँच केला आहे. युजर्सला नवीन नोकिया फोनमध्ये एमपी ३ आणि एफएम रेडियो यासारखे फीचर्स मिळणार आहेत. तसेच या फोनला दोन स्पीकर्स देण्यात आले आहेत. व्हाइट-रेड आणि ब्लॅक-रेड या रंगात हे फोन खरेदी करता येवू शकतात. भारतात हा फोन कधी लाँच होईल, यासंदर्भात कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. नोकिया ५३१० ची किंमत नोकिया ५३१० ची किंमत ३९ यूरो म्हणजेच जवळपास ३ हजार १०० रुपये आहेत. या फीचर फोनचा सेल पुढच्या महिन्यापासून म्हणजेच एप्रिलपासून सुरू होणार आहे. नोकिया ५३१० ची खास वैशिष्ट्ये या फोनमध्ये कंपनीने २.४ इंचाचा क्यूव्हीजीए डिस्प्ले दिला आहे. तसेच या फोनमध्ये एमटी ६२६० ए सीपीयू आणि ८ एमबी रॅम प्लस १६ एमबी स्टोरेज दिला आहे. या स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. हा फोन ३० प्लस ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. या फोनमध्ये व्हीजीए कॅमेरा दिला आहे. तसेच कनेक्टिविटीसाठी यात मायक्रो यूएसबी पोर्ट ड्युअल सिम आणि ब्लूटूथ ३.९ यासारखी फीचर्स दिली आहेत. तसेच युजर्सला या फोनमध्ये १२०० क्षमतेची बॅटरी दिली आहे. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर २२ दिवस चालते, असा कंपनीने दावा केल आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/395UJhR
Comments
Post a Comment