नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्यानंतर १४ एप्रिल २०२० पर्यंत देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे लोकांना सध्या घरातच राहावे लागत आहे. करोनाची भीती पसरल्याने अनेक जण याचा गैरफायदा घेत आहेत. आता नेटफ्लिक्ससंबंधी एक मेसेज सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. घरी राहणाऱ्या लोकांना एक महिन्यांचे फ्री सब्सक्रिप्शन देत आहे. असा खोटा मेसेज सध्या व्हायरल होत आहे. व्हॉट्सअॅपवर एक लिंक पाठवली जात असून या लिंकद्वारे नेटफ्लिक्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जात असल्याचा दावा करण्यात येत आहे. जर तुम्हालाही या पद्धतीचा मेसेज आला असेल तर किंवा नेटफ्लिक्स पासेस देवू असे सांगितले असेल तर यावर आजिबात विश्वास ठेवू नका. कारण हा मेसेज फेक आहे. नेटफ्लिक्सने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. काही युजर्संना लिंक पाठवली असून ही लिंक ओपन केल्यास नेटफ्लिक्सचे फ्रीमध्ये सब्सक्रिप्शन मिळेल, असे सांगितले जात आहे. यासंदर्भात नेटफ्लिक्सच्या प्रवक्त्यांने स्वतः याची माहिती दिली आहे की, यावर विश्वास ठेवू नका. कंपनी या प्रकारची कोणतीही फ्री सेवा देत नाही. जर कोणाला अशी लिंक मिळाली तर त्यावर विश्वास ठेवू नये. या लिंकला क्लिक केल्यानंतर सर्वे पूर्ण करण्यास सांगितले जाते. त्यानंतर १० व्हॉट्सअॅप कॉन्टॅक्ट देण्यास सांगितले जाते. स्कॅमर्सने यासाठी फेसबुकप्रमाणे दिसत असलेली फेक वेबसाइट बनवण्यात आली आहे. ज्यात हा पण दावा केला जात आहे की, टेस्टिमोनियल्स मिळते. हे सर्व खोटे आहे. या अशा मेसेज पासून सावध राहण्याचा सल्ला कंपनीने दिला आहे.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2QKKCcb
Comments
Post a Comment