नवी दिल्लीः चीनची मोबाइल कंपनी २४ मार्चला रेडमी के ३० प्रो हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करणार आहे. या स्मार्टफोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात बॅक ग्लास आणि मेटल फ्रेमसह येणार आहे. तसेच फ्रंटला ड्युअल आणि रियर मध्ये चार कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. जो एलईडी लाइट सह येणार आहे. पॉवरसाठी या फोनमध्ये दमदार बॅटरी बॅक अप दिला आहे. तसेच ३३ वॅट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे. करोनाची सध्याची स्थिती पाहता हा स्मार्टफोन ऑनलाइन लाँचिंक करण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले दिला आहे. फोनचा रिझॉल्यूशन २३४०x१०८० पिक्सल आहे. तसेच याचा आस्पेक्ट रेशिओ २०:९ दिला आहे. डिस्प्लेचा १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट आहे. फोनच्या डिस्प्लेची सुरक्षा करण्यासाठी यात गोरिला ५ चे प्रोटेक्शन दिले आहे. रेडमी के ३० प्रोमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ एसओसी चा वापर करता येणार आहे. फोनमध्ये अँड्रॉयड १० आउट ऑफ द बॉक्सवर आधारित एमआययूआय ११ वर काम करणार आहे. कंपनी हा फोन ८ जीबी रॅममध्ये लाँच करणार आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये चार रियर कॅमेरे दिले आहेत. यात पहिला कॅमेरा ६४ मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स ६८६ सेन्सर, दुसरा २० मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर, ८ मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स आणि १२ मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर दिला जावू शकतो. पॉवरसाठी या मोबाइलमध्ये ४७०० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली जाणार आहे. तसेच ३३ वॅट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे. सुरक्षेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. रेडमी के ३० प्रोमध्ये ५जी मधील ३.५ एमएम हेडफोन जॅक, टाइप सी चार्जर, वाय फाय यासारखी फीचर्स दिले आहेत.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ad9gJU
Comments
Post a Comment