रेडमी K20 सीरीजच्या ५० लाख फोनची विक्री

नवी दिल्लीः शाओमीची सबब्रँड कंपनीने लेटेस्ट स्मार्टफोन रेडमी के ३० प्रो लाँच केला आहे. तर दुसरीकडे रेडमी के २० सीरिजने नवा रेकॉर्ड केला आहे. कंपनीच्या या फोनच्या विक्री ५० लाखांहून अधिक विक्री झाली आहे. रेडमी के२० सीरिजने आता नवा रेकॉर्ड बनवला आहे. चीनची मायक्रोब्लॉगिंग साइट वक याची माहिती देण्यात आली आहे. कंपनीकडून करण्यात आलेल्या Weibo च्या पोस्टमध्ये नवीन Redmi K30 Proच्या घोषणेआधी रेडमी के २० ची माहिती दिली. शाओमीकडून Redmi K30 Pro हा स्मार्टफोन आज चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा रेडमी के३० चे टॉप नॉच स्पेसिफिकेशनचे प्रो व्हर्जन आहे. Redmi K30 Pro स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसरचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. रेडमी के२० सीरीजचे ४५ हून अधिक जास्त स्मार्टफोनची विक्री झाली आहे. ची खास वैशिष्ट्ये Redmi K20 Pro मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८५५ प्रोसेर दिला आहे. या फोनमध्ये ८ जीबी रॅम देण्यात आला आहे. अँड्रॉयड ९ पाय वर चालणाऱ्या या फोनमध्ये ६.३९ इंचाचा अमोलेड फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन १०८०X२३४० पिक्सल आहे. याचे आस्पेक्ट रेशियो १९.५:९ आहे. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. पहिला ४८ मेगापिक्सल, १३ मेगापिक्सल आणि ८ मेगापिक्सलचा सेटअप दिला आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी २० मेगापिक्सलचा पॉप अफ कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. फास्ट चार्जिंगसाठी २७ वॅट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33JhVSg

Comments

clue frame