नवी दिल्लीः भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) च्या युजर्ससाठी कंपनीने मोठा झटका दिला आहे. कंपनीने आपला १६०० रुपयांच्या वार्षिक प्लानची वैधता आता कमी केली आहे. आता या प्लानमध्ये ३०० दिवसांची वैधता मिळणार आहे. तसेच १८६ रुपये, १८७ रुपये, ९८ रुपये, ९९ रुपये आणि ३१९ रुपयांच्या प्लानमध्ये सुद्धा बदल केले आहेत. या प्लानमध्ये करण्यात आलेले बदल १ एप्रिलपासून लागू करण्यात येतील. १६९९ रुपयांच्या प्लानमध्ये बदल ३६५ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये ३०० दिवसांची वैधता करण्यात आली आहे. या प्लानमध्ये इतर कोणताही बदल केला नाही. प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस सह कॉलिंगसाठी २५० मिनिट दिले जाणार आहेत. इंटरनेटसाठी दररोज २ जीबी डेटा दिला जाणार आहे. या प्लानची वैधता कमी केली बीएसएनएलने ९८ रुपये, ३१९ रुपये या खास टॅरिफ व्हाऊचर्सची वैधता कमी केली आहे. आता ९८ रुपयांच्या व्हाऊचरमध्ये २२ दिवसांची वैधता करण्यात आली. या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा आणि इरॉज नाऊचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाणार आहे. ९९ रुपयांच्या प्लानमध्ये कॉलिंगसाठी दररोज २५० मिनिट मिळणार आहे. या प्लानची वैधता २४ दिवसांऐवजी आता २२ दिवसाची केली. ३१९ रुपयांच्या टॅरिफ व्हाउचरमध्ये आता ७५ दिवसांची वैधता दिली जात आहे. याआधी ८४ दिवसांची वैधता मिळत होती. कॉलिंगसाठी या पॅकमध्ये दररोज २५० मिनिट दिले जाणार आहे. १८६ रुपये आणि १८७ रुपये १६९९ रुपयांच्या वार्षिक प्लानसोबत कंपनीने १८६ रुपये आणि १८७ रुपयांच्या प्लानमध्ये बदल केले आहेत. कंपनीने या दोन्ही प्लानमधील डेटा १ जीबी कमी केला आहे. या बदलानंतर युजर्संना आता दरदिवशी ३ जीबी ऐवजी केवळ २ जीबी डेडा मिळणार आहे. या प्लानची वैधता २८ दिवस इतकी आहे. तसेच या दोन्ही प्लानमध्ये २५० मिनिट फ्री कॉलिंग युजर्संना मिळणार आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39vuVfz
Comments
Post a Comment