१० टक्के भागीदारी खरेदीवरून जिओ-फेसबुकमध्ये चर्चा?

नवी दिल्लीः भारताची सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आणि जगातील सर्वात मोठी सोशल मीडिया कंपनी फेसबुक यांच्यात १० टक्के भागीदारी खरेदीवरून चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. फेसबुक जिओची १० टक्के भागीदारी करणार आहे. या भागीदारी खरेदीची किंमत लाखो डॉलर्स मध्ये असणार आहे. फायनान्शियल टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, फेसबुक कंपनीला रिलायन्स जिओमधील १० टक्के भागीदारी खरेदी करायची आहे. तसेच जिओ फेसबुक शिवाय गुगलसोबतही पार्टनरशीप करण्यासाठी चर्चा करीत असल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. सध्या जिओचे बाजार मूल्य व्हॅल्यू $65-70 डॉलर म्हणजेच ५ हजार कोटी ते ५ हजार ३५० कोटी रुपये इतके आहे. त्यामुळे जिओमध्ये फेसबुकला १० टक्के भागीदारी खरेदी करायची आहे. यासाठी फेसबुकला साडे सहा ते ७ बिलियन डॉलर मोजावे लागतील. परंतु, जिओने या चर्चेविषयी अद्याप कोणतीही माहिती जाहीर केलेले नाही. किंवा या भागीदारीवरून अद्याप काहीही पुढे येवून सांगितलेले नाही. रिलायन्स जिओ २०१५ साली लाँच करण्यात आला आहे. परंतु, अधिकृतपणे २०१६ ला याची लाँचिंग करण्यात आली. केवळ तीन वर्षात जिओच्या ग्राहकांची संख्या ३७ कोटींपेक्षा जास्त झाली आहे. तसेच जिओ सध्या भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी बनली आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2xlYWAT

Comments

clue frame