हँडवॉशचे फायदे सांगणारे गुगलचे खास डूडल

नवी दिल्लीः सर्च इंजिन कंपनी विविध कार्यक्रमांच्या खास दिनी आपल्या होमपेजवर एक खास बनवते. आज फादर ऑफ इन्फेक्श कंट्रोल नावाने खास डूडल बनवले आहे. हे टायटल हंगरीचे डॉक्टर इग्नेज सेम्मलवीज यांना दिले आहे. त्यांना हात धुण्याचे फायदे सांगणारे पहिले व्यक्ती म्हणून ओळखले जाते. सध्या जगभरात करोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. मोठ्या प्रमाणात त्याचा प्रसार होत आहे. करोनाला रोखण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. गुगलने हात स्वच्छ धुण्याचे फायदे सांगण्यासाठी आज एक खास डूडल बनवले आहे. हंगरीच्या फिजिशियन इग्नैज यांनी सर्वात आधी हात धुवायचे फायदे सांगितले होते. २० मार्च १८४७ रोजी सेम्मलवीजने वियना जनरल हॉस्पिटलच्या मॅटरनिटी क्लिनिकमध्ये हात स्वच्छ धुण्यासाठी आग्रह धरला होता. या क्लिनिकमध्ये त्यांना चीफ रेजिडेंट बनवण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी सर्व फिजिशियन यांना त्यांचे हात क्लोरिनेटेड लाइम सॉलूशनच्या मदतीने डिसइन्फेक्ट करण्यास सांगितले. इग्नेजला मॅटरनिटी क्लिनिकचे चीफ रेजिडेंट बनवण्याआधी आई होणाऱ्या असंख्य महिलांना इन्फेक्शन (संसर्ग) आणि डिलिव्हरी नंतर ताप यायचा आणि त्यात त्यांचा मृत्यू होत असायचा. त्या पाठीमागचे कारण त्यांनी शोधून काढले. डॉक्टर स्वच्छ हात धुत नसल्याने हा संसर्ग होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे आई होणाऱ्या महिलांना संसर्ग होत होता. डूडलमध्ये हँडवॉश करण्याची पद्धत सोम्मवीज त्यांच्या सहकारी डॉक्टरांवर नाराज होते. स्वच्छता न ठेवणाऱ्या त्यांच्यावर हत्येचा आरोप लावण्यात आले. त्यांना मानसिक रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. इग्नैज यांच्या मृत्यूनंतर हात धुण्याचे फायदे किती महत्त्वाचे आहेत, हे निदर्शनास आले. त्यांच्या कामामुळे आज गुगलने डूडल बनवले आहे. यात हात धुण्याची बरोबर पद्धत सांगण्यात आली आहे.


from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2U88Oax

Comments

clue frame