करोनाः ओप्पो, रियलमी, विवोचे मॅन्यूफॅक्चरिंग प्लांट बंद

नवी दिल्लीः करोना व्हायरस संसर्ग कमी होताना दिसत नाही. दिवसेंदिवस तो वाढताना दिसत आहे. त्यामुळे चीनची कंपनी ओप्पो, विवो आणि कंपनीने भारतातील ग्रेटर नोएडा येथील मॅन्यूफॅक्चरींग प्लांट तात्पुरता बंद केला आहे. तसेच रियलमीने पुढील सूचना येईपर्यंत आपला कारखान्यातील कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांसाठी देशात लॉकडाऊन करण्याची घोषणा केल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. याआधी शाओमी कंपनीने लॉकडाऊन ध्यानात ठेवून आपले एमआय होम्स पुढील सूचना मिळे पर्यंत बंद केले होते. याची माहिती कंपनीचे ग्लोबल उपाध्यक्ष मनु कुमार जैन यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करुन याची माहिती दिली. मनु कुमार जैन यांनी ट्विटमध्ये लिहिले की, सध्याची स्थिती पाहता कंपनीने हा निर्णय घेतला आहे की, कंपनीच्या या निर्णयामुळे करोना व्हायरस रोखण्यासाठी मदत होईल. दरम्यान, करोना व्हायरसमुळे जगभरातील उद्योग क्षेत्राला जबर फटका बसला आहे. ऑटो क्षेत्रापासून ते मोबाइल क्षेत्रांना याचा फटका बसला आहे. करोना व्हायरसमुळे ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टने एक मोठा निर्णय घेतला आहे. फ्लिपकार्टने आपली सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद केली आहे. फ्लिपकार्टच्या साइटवर एक मेसेज येत आहे. ज्यावर लिहिलेय की, आम्ही आमची सेवा तात्पुरती बंद केली आहे. कारण, आमचा प्रयत्न आहे, आम्ही लवकरच परत येवू. फ्लिपकार्टने लिहिलेय, सध्याची परिस्थिती खूप कठीण आहे. याआधी असे कधीच घडले नाही. आमची तुम्हाला विनंती आहे, की तुम्हीही तुमच्या घरात सुरक्षित राहा. आम्ही लवरकच परत येवू, असे म्हटले आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33HXl4q

Comments

clue frame