'विवो इंडिया'कडून राज्य सरकारला १ लाख मास्क

मुंबईः चीनची स्मार्टफोन कंपनी विवो इंडियाने भारतातील करोना व्हायरस रोखण्यासाठी आपली छोटीशी मदत जाहीर केली आहे. विवो इंडियाने राज्य सरकारकडे १ लाख दिले आहेत. तसेच याशिवाय कंपनीने ५ हजार एन९५ मास्क सुद्धा दान दिले आहेत. करोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे या परिस्थितीत आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची सुरक्षा ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे हे मास्क त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात, असे कंपनीने म्हटले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कंपनीचे आभार मानले आहेत. विवो इंडिया ब्रँड स्ट्रेटडीचे संचालक निपूण मार्या यांनी म्हटले, संकटाच्या काळात आपण सर्वांनी एकजूट राहणे महत्त्वाचे आहे. जागतिक महामारी संकटात आमची थोडीशी मदत व्हावी या उद्देशाने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. म्हणून महाराष्ट्र सरकारला १ लाख मास्क दिल्याचे निपूण मार्या यांनी सांगितले. करोना व्हायरसमुळे आम्ही आमचे सर्व नवीन प्रोडक्टच्या लाँचिंगला स्थगिती दिली आहे. सध्या आरोग्य कर्मचारी जी मेहनत घेत आहे, त्यांच्या कार्याला सलाम करतो म्हणून आम्ही राज्य सरकारला मदत करू इच्छितो, असे कंपनीने म्हटले आहे. याआधी शाओमीने भारतात एक लाख एन९५ मास्क वाटप करण्याची घोषणा केली आहे. शाओमी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनु कुमार जैन यांच्या माहितीनुसार, हे सर्व मास्क दिल्ली, पंजाब, आणि कर्नाटक या राज्यात वाटप केले जाणार आहेत.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39pEMDk

Comments

clue frame