नवी दिल्लीः करोना व्हायरसचा संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. त्यामुळे रिलायन्स जिओने आपल्या युजर्ससाठी करोना व्हायरसचे अपडेट देण्याचे ठरवले आहे. टेलिकॉम ऑपरेटल माय जिओ अॅप मध्ये एक नवीन फीचर अॅड केले आहे. या फीचरमुळे जिओ ग्राहकांना करोना व्हायरसचे प्रत्येक अपडेटची माहिती मिळणार आहे. तसेच जिओने नुकताच वर्क फ्रॉम होम पॅक सुद्धा आणला आहे. युजर्संना या पॅकमधून दररोज २ जीबी डेटा मिळणार आहे. जिओ अॅप मध्ये मिळणाऱ्या या अॅपचे नाव करोना व्हायरस इन्फो अँड टूल असे ठेवण्यात आले आहे. या अॅपच्या हॅमबर्गर मेन्यू वर टॅप केल्यानंतर अॅक्सेस मिळतो. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एक मेसेज युजर्सला दिसेल. यात करोना व्हायरस (COVID-19) एक संसर्ग आजार आहे, असे लिहिलेले असेल. खाली दिलेल्या पर्यायाच्या मदतीने यासंबंधीची माहिती वाचायला मिळेल. या नव्या फीचरमध्ये अनेक पर्यायाची यादी देण्यात आली आहे. संसर्ग झाल्याची लक्षणे, तासणी कशी कराल, चाचणी सेंटर्सची यादी, आकडेवारी, हेल्पलाइन आणि FAQ यासारख्या पर्यायाचा समावेश यात दिला आहे. युजर्संना हे चेक करण्याचा पर्याय मिळत आहे. कोणते लक्षणे दिसल्यानंतर करोना झाल्याचे निदान होते, सामान्य लक्षणे कोणती, संपूर्ण राज्यांची सेंटर्सची यादी या ठिकाणी युजर्संना मिळणार आहे. भारतात करोना संसर्ग किती जणांना झाला आहे. किती लोकांना लागण झाली, किती लोक बरे होऊन घरी पोहोचले, किती लोकांचा मृत्यू झाला आहे, या सर्वांची माहिती जिओ युजर्संना यात मिळणार आहे. तसेच हेल्पलाइन नंबर, सर्व राज्यांचे हेल्पलाइन नंबर्स, करोनाची आकडेवारी युजर्संना या ठिकाणी मिळणार आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2xeM2Vs
Comments
Post a Comment