नवी दिल्लीः करोना व्हायरसची भीती जगभरात पसरली आहे. या आजाराचा लवकरात लवकर उपचार व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काही जणांना साधा ताप आला तरी प्रचंड भीती वाटत आहे. सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जात आहे. देशातील प्रमुख शहरात लॉकडाउन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा पुरवली जात आहे. लोकांच्या मदतीसाठी अपोलो हॉस्पिटल धावून आले आहे. या हॉस्पिटलने एक सेवा सुरू केली आहे. ज्या तुम्ही घरात बसून मोबाइल किंवा लॅपटॉपवरून तुमची टेस्ट करू शकता. तुम्हाला करोना व्हायरसची लागण झाली आहे की नाही, याची माहिती ऑनलाइन कळू शकणार आहे. या टेस्टसाठी अपोलो हॉस्पिटलने एक लिंक दिली आहे. या लिंकवर जावून सेल्फ टेस्टिंग असाइनमेंट दिले आहे. या ठिकाणी एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स कडून चालवण्यात येत आहे. या ठिकाणी सेल्फ टेस्ट करण्यात येवू शकते. सध्या तुमचे आरोग्य कसे आहे. जर यावेळी आरोग्य खूपच खालावले असेल तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. व उपचार करा. अशी करा टेस्ट या टेस्टचा वापर करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमचे वय विचारले जाईल. त्यानंतर तुमचे जेंडर विचारले जाईल. नंतर शरीराचे तापमान किती आहे हे सांगावे लागेल. यावेळी तुमच्या शरीरात कोणते बदल होत आहेत. तुम्ही प्रवास केला आहे का?, याची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला याआधी कोणता गंभीर आजार होता का, हे विचारण्यात येईल. ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला कोविड रिस्क रिजल्ट मिळेल. विशेष म्हणजे, काहीही चुकीची माहिती सांगण्यात येणार नाही, याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. लोकांच्या मदतीसाठी अपोलोने आपल्या वेबसाइटवर एक इमरजन्सी नंबर ०८०४७१९२६०६ जारी केला आहे. या नंबरचा आपातकालीन स्थितीत वापर करू शकता. देशात ५२७ जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच आता पर्यंत १० जणांचा यात मृत्यू झाला आहे. करोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण, महाराष्ट्र आणि केरळमध्ये आहेत. महाराष्ट्रात आता पर्यंत १०१ तर केरळमध्ये ९५ लोकांना संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2UyBKY3
Comments
Post a Comment