करोना व्हायरसः लॉकडाऊनमुळे 'या' कंपन्यांची फ्रीमध्ये सेवा

नवी दिल्लीः करोना व्हायरसमुळे संपूर्ण जग भीतीच्या छायाखाली आले आहे. जगभरातील अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. भारतात करोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी लोकांना घरात राहण्याचा सल्ला दिला जात आहे. या लॉकडाऊनमध्ये अनेक कंपन्यांनी लोकांना घरात राहावे म्हणून आपल्या युजर्संना फ्रीमध्ये सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. या यादीत केवळ डेटा पॅक आणि ऑनलाइन रिडिंग सेवेचा समावेश नाही तर डेटिंग सर्विसचाही समावेश आहे. Tinder: करोना व्हायरसमुळे लोकांना घरात बंदीस्त केले आहे. परंतु, याचा अर्थ असा नाही की, तुम्ही कोणाला डेट करू शकत नाही. ही सुविधा मिळावी यासाठी टिंडरने आपला पासपोर्ट फीचर बनवले आहे. जे ३० एप्रिल पर्यंत सर्व युजर्संसाठी फ्रीमध्ये असणार आहे. युजर्सला फ्रीमध्ये पसंतीचे ठिकाणाची निवड करून अन्य शहरांची माहिती मिळवण्याची सुविधा मिळणार आहे. ही सुविधा टिंडर प्लस आणि गोल्ड युजर्ससाठी उपलब्ध आहे. Pornhub: पोर्न वेबसाइट पोर्नहब ने आपला प्रीमियम कंटेट जगभरातील सर्व युजर्ससाठी फ्री केला आहे. कंपनीने या महिन्याच्या सुरुवातीला इटलीत आपल्या सर्व युजर्संसाठी ही सेवा फ्री केली होती. परंतु, आता जगभरातील युजर्संसाठी ही सेवा फ्री करण्यात आली आहे. पोर्नहब प्रीमियम ची किंमत ७०० ते ८०० रुपये प्रति महिना इतकी असते. परंतु, ही सेवा आता २३ एप्रिल पर्यंत फ्री करण्यात आली आहे. BSNL: बीएसएनएल ने आपल्या युजर्ससाठी वर्क फ्रॉम होम प्लान आणला आहे. या प्लान अंतर्गत युजर्संना 10Mbps च्या स्पीडने दर रोज ५ जीबी डेटा मिळणार आहे. ५ जीबी डेटा संपल्यानंतर नेटवर्क 1Mbps च्या स्पीडने काम करेल. बीएसएनएल कंपनीने आपल्या लँडलाइन युजर्ससाठी फ्रीमध्ये प्लान आणला आहे.


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2QHULX1

Comments

clue frame